AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“घर मोठं अन् रिकामं वाटतंय…” वडिलांच्या निधनानंतर दिग्दर्शकची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट

वडिलांनी वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांच्या निधनानंतर दिग्दर्शकाने सोशल मीडियावर एक काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिग्दर्शकाच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

घर मोठं अन् रिकामं वाटतंय... वडिलांच्या निधनानंतर दिग्दर्शकची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
Anubhav Sinha
| Updated on: Nov 22, 2026 | 12:20 PM
Share

बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनुभव सिन्हा यांचे वडील प्रेम सिन्हा यांनी वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अनुभव यांच्या वडिलांनी 19 नोव्हेंबर रोजी जवळपास रात्री 9 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता सिन्हा यांना अखेरचा निरोप देण्यात आला. वडिलांच्या निधनानंतर अनुभव प्रचंड दुःखी आहेत. वडिलांच्या निधनाचं दुःख व्यक्त करत अनुभव यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिन्हा यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

वडिलांच्या आठवणीत अनुभव सिन्हा यांची भावूक पोस्ट…

पोस्ट शेअर करत अनुभव सिन्हा म्हणाले, ‘अचानक असं झालं आहे की, घर मोठं वाटू लागलं आहे… अचानक असं झालं की, आता त्यांच्यासोबत कोणताच फोटो नसणार… अचानक असं झालं की आता त्यांच्यासाठी मिठाई शोधणं बंद होणार आहे… बाकी सर्व जसं आहे तसं राहणार आहे.. त्यांच्यासोबत गप्पा… नाही… सर्व काही आता पूर्वी सारखं राहणार नाही. 95 वर्ष फार कमी असतात. पण जास्त देखील नसतात.. ‘

एवढंच नाही तर, अनुभव यांनी त्यांच्या वडिलांशी संबंधित एक जुना किस्साही शेअर केला. त्यांनी सांगितलं की, त्यांची आई त्यांना अनेकदा एक गोष्ट सांगायची. जेव्हा त्यांचे वडील लग्नासाठी त्यांच्या आईला पाहायला गेले होते, तेव्हा त्यांना गाणं म्हणण्याचा आग्रह करण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांचं आवडतं गाणं ‘छोटी सी ये जिंदगी रे’ हे गाऊन दाखवलं होतं.

त्यांनी लिहिले, ‘आई सांगायची, जेव्हा बाबा तिला लग्नासाठी पाहायला गेले होते, तेव्हा त्यांनी गाणं गावं असा आग्रह धरला. तेव्हा त्यांनी त्यांचं आवडतं गाणं ‘छोटी सी ये जिंदगानी रे’ हे गायलं होतं. नंतर आम्हीही त्यांच्याकडून हे गाणे अनेकदा ऐकायचो.’ असं देखील अनुभव सिन्हा यांनी सांगितलं आहे.

दिया मिर्झासह अनेक कलाकारांनी व्यक्त केले दुःख

अनुभव सिन्हा यांच्या या पोस्टवर चित्रपटसृष्टीतील अनेकांनी कमेंट करून त्यांच्या वडिलांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अभिनेत्री दिया मिर्झा, नीना गुप्ता, दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्या पत्नी सुतापा सिकदर, मानव विज आणि सिनेमा निर्माते शूजित सरकार यांच्यासह अनेक कलाकारांनी या कठीण काळात त्यांचे सांत्वन केलं आणि त्यांना धीर दिला.

अनुभव सिन्हा यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचा ‘अस्सी’ हा सिनेमा शेवटचा प्रदर्शित झाला होता. यामध्ये तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसली होती. याशिवाय अनुभव सिन्हा हे ‘आर्टिकल 15’, ‘थप्पड’ आणि ‘मुल्क’ यांसारख्या सिनेमांच्या दिग्दर्शनासाठीही ओळखले जातात.

Follow Us
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन..
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन 3450 रुपये दर
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदार..
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदारांचा हिशोब द्या! नंतर...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना...
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना संभाजी पाटील निलंगेकरांचे जोरदार प्रत्युत्तर
अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
संजय राऊतांचा खळबळजनक दावा! अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी...
Vilas Londhe : टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी स्पष्ट केली भूमिका
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर...
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर सांगितलं रंजक गुपित
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा...
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात
मुंबईत हुडहुडी! 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद...
मुंबईत हुडहुडी! 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद, प्रदूषणातही वाढ