…तर असे होतात स्कूटी चालवणाऱ्या मुलींचे हाल, IPS अधिकाऱ्यानं शेअर केलेला Video पाहाच!

सोशल मीडिया(Social Media)चं जग अद्भुत आहे. इथं दररोज काही ना काही मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Viral) होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, जो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसायला येईल.

...तर असे होतात स्कूटी चालवणाऱ्या मुलींचे हाल, IPS अधिकाऱ्यानं शेअर केलेला Video पाहाच!
Scooty-Girls

सोशल मीडिया(Social Media)चं जग अद्भुत आहे. इथं दररोज काही ना काही मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Viral) होत असतात. यातील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठं आश्चर्य वाटेल, तर कुठं हसू येईल. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, जो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसायला येईल. या व्हिडिओमध्ये अनेक छोट्या क्लिप आहेत, यात मुली स्कूटीवरून पडताना दिसत आहेत. या व्हिडिओला यूजर्स आवडीनं पाहतायत. यासोबतच व्हिडिओवर मजेशीर कमेंट्सही देत ​​आहेत.

स्कूटीवरच्या मुली व्हिडिओच्या सुरुवातीला एक व्यक्ती तोंडावर दुपट्टा बांधून डोळ्यात शेड्स लावताना दिसत आहे. त्यानंतर तो सांगतो, की आता फनी व्हिडिओ सुरू होतोय. व्हिडिओ सुरू होताच काजोल आणि शाहरुख खानच्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं ‘जरा सा झूम लू मैं’ हे गाणं वाजतं. त्याचवेळी गाण्यासोबतच मुली स्कूटीवरून पडताना, आदळताना दिसत आहेत. सोशल मीडिया यूजर्सना हा व्हिडिओ खूपच मजेदार वाटतोय.

अनेकांनी केलाय शेअर हा व्हिडिओ आयपीएस रुपीन शर्मा यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिलंय, की स्कूटी गर्ल्स. 20 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 22 हजार लोकांनी पाहिलाय. तसेच लोकांनी मजेदार कमेंट्सही दिल्या आहेत. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करताना एका यूजरनं लिहिलंय, पापा की परी उड़ चली, आणखी एका यूजरनं लिहिलंय, की आता या व्हिडिओवर मुलींच्या कमेंट्स येणं बाकी आहे. दुसर्‍यानं लिहिलंय, की मी तर असले कारनामे लाइव्ह पाहिलेत.

पूर्ण पाहिल्याशिवाय राहणार नाहीत 1992च्या बॅचचे आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते अनेकदा आपल्या फॉलोअर्सना मजेदार व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. यूजर्सनाही त्यांच्या पोस्ट खूप आवडतात. यामुळेच IPS शर्मा जेव्हाही एखादी पोस्ट शेअर करतात, तेव्हा ती लगेच व्हायरल होते. सध्या त्यांचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्ही राहू शकणार नाहीत. कारण आहेच तेवढा मजेदार…

Video : वाघिणीनं केलेली शिकार कॅमेऱ्यात कैद, पाहा ताडोबा-अंधारीतलं वाघिणीचं अनोखं दर्शन!

Desi Jugaad : टाकाऊ ड्रमपासून बनवलं वॉशिंग मशीन; यूझर्स म्हणतायत, भलेभले इंजिनिअर्सही होतील नापास!

Viral : मुलांच्या वसतिगृहात हनुमान चालिसाचं पठण! काय वेगळेपण? हा हटके Video पाहाच..

Published On - 12:19 pm, Sat, 8 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI