Viral : मुलांच्या वसतिगृहात हनुमान चालिसाचं पठण! काय वेगळेपण? हा हटके Video पाहाच..

सोशल मीडिया(Social Media)वर एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय. मुलांच्या हॉस्टेल(Boys Hostel)चा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मुलं एकत्र असं काहीतरी करताना दिसतायत, जे पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

Viral : मुलांच्या वसतिगृहात हनुमान चालिसाचं पठण! काय वेगळेपण? हा हटके Video पाहाच..
मुलांच्या वसतिगृहात हनुमान चालिसाचं पठण (सौ. frustrated4thoughts - insta)

सोशल मीडिया(Social Media)वर एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय. मुलांच्या हॉस्टेल(Boys Hostel)चा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मुलं एकत्र असं काहीतरी करताना दिसतायत, जे पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बॉइज हॉस्टेलमध्ये जाऊन मुलं बिघडतात, असं समजणाऱ्या प्रत्येकानं हा व्हिडिओ पाहावा.

सोशल मीडियावर होतोय व्हायरल हा व्हिडिओ प्रत्येक पालकांनी पाहावा ज्यांची मुलं वसतिगृहात राहतात. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही विचारात पडाल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून नेटिझन्सना तो खूप आवडलाय. या व्हिडिओमध्ये बॉइज हॉस्टेलमध्ये मुलं एकत्र हनुमान चालिसाचं पठण करताना दिसतायत.

रांगेत बसून चालिसापठण हा व्हिडिओ मुलांच्या वसतिगृहातला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की अनेक मुलं रांगेत बसून हनुमान चालिसाचं पठण करत आहेत. त्यांच्यासमोर टेबलावर लॅपटॉप ठेवलेला दिसतो. या लॅपटॉपमध्ये हनुमान चालीसा ऐकण्यात येतोय. लॅपटॉपमध्ये हनुमान चालीसा ऐकून सर्व मुलं हनुमान चालिसाचा जप करत आहेत. आधी हा व्हिडिओ पाहू या…

व्ह्यूज वाढताहेत व्हिडिओमध्ये एक गंमतीदार गोष्ट लिहिलीय, ‘नातेवाईक : मुलं वसतिगृहात बिघडतात, तर त्यांना तुम्ही घरी शिकवा. इथं मुलं हे करतात. हा व्हिडिओ प्रचंड लाइक केला जातोय. काही वेळातच याच्या व्ह्यूजचा आकडा 1 मिलियनच्या पुढे गेलाय. त्याचवेळी वसतिगृहात राहणारी मुलं त्यांच्या पालकांना हा व्हिडिओ पाठवत आहेत.

‘परीक्षा होणाराय बहुतेक’ frustrated4thoughts नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. व्हिडिओ पाहून हजारोंच्या संख्येनं लोक कमेंट करत आहेत. व्हिडिओ पाहून एका यूजरनं ‘जय श्री राम’ अशी कमेंट केलीय. तर दुसरीकडे आणखी एका यूजरनं मजेशीर कमेंट केलीय. त्यानं लिहिलंय, की त्या सर्वांची परीक्षा होणार आहे, असं दिसतंय. सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओवर मनापासून कमेंट करत आहेत आणि इमोजीही टाकत आहेत.

माणसं ती माणसं जनावरही तसंच ! नेपाळी वाघिणीच्या प्रेमात भारतीय वाघानं रक्ताच्या बछड्याला संपवलं

Viral : नववधूच्या धमाकेदार एंट्रीनं नवरोबा आश्चर्यचकित! शेवटी तर आहे क्यूट ट्विस्ट, पाहा Video

कतरिना, करीना हिच्यापुढं सगळ्या फिक्या, अस्सल अहिराणी गाण्यावरचा 20 सेकंदाचा हा Video पुन्हा पुन्हा पहाल

Published On - 10:25 am, Sat, 8 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI