AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral : नववधूच्या धमाकेदार एंट्रीनं नवरोबा आश्चर्यचकित! शेवटी तर आहे क्यूट ट्विस्ट, पाहा Video

भारतीय लग्नाशी संबंधित व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होत असतात. विशेषतः सोशल मीडिया यूझर्सना वधू-वरांशी संबंधित असे व्हिडिओ मोठ्या उत्साहानं पाहायला आवडतात. सध्या असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

Viral : नववधूच्या धमाकेदार एंट्रीनं नवरोबा आश्चर्यचकित! शेवटी तर आहे क्यूट ट्विस्ट, पाहा Video
नववधू
| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 7:00 AM
Share

भारतीय लग्नाशी संबंधित व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होत असतात. विशेषतः सोशल मीडिया यूझर्सना वधू-वरांशी संबंधित असे व्हिडिओ मोठ्या उत्साहानं पाहायला आवडतात. यामुळेच इंटरनेटवर असं काही व्हायरल झालं की यूझर्सच्या त्यावर उड्या पडतात. यामध्ये कुठं वधू-वरांचे गोड क्षण काही व्हिडिओंमध्ये पाहायला मिळतात, तर कधी वधूची एन्ट्री पाहायला मिळते. सध्या असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नववधू तिच्या धमाकेदार नृत्यानं एंट्री घेऊन वर राजाला आश्चर्यचकित करते. या व्हिडिओच्या शेवटी एक अतिशय मस्त ट्विस्ट आहे, जे पाहण्यासारखं आहे.

इंटिरियर डिझायनर आहे वधू व्हिडिओ क्लिपमध्ये दिसणाऱ्या वधूची ओळख साबा कपूर, एक इंटिरियर डिझायनर म्हणून करण्यात आली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सबा कपूर आणि तिचे कुटुंब बॉलिवूड चित्रपटांच्या गाण्यांवर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. नववधूने ग्रँड एंट्री घेताच तिच्यासोबत सर्वजण तिच्या तालावर नाचू लागतात. यादरम्यान सबाच्या बहिणी तिला नृत्यात साथ देतात. ग्रे आणि सिल्व्हर कलरच्या लेहेंग्यात सबा खूपच सुंदर दिसत आहे. नृत्यानंतर, व्हिडिओच्या शेवटी एक अतिशय मस्त ट्विस्ट आहे. सहाजिकच आम्ही ते सांगणार नाही. या व्हिडिओमध्ये तुम्ही ते स्वतः पाहा.

वधूची सरप्राइज एंट्री वधूचा हा अतिशय छान असा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ysdcweddingchoreography नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यूझरनं कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘वधूची सरप्राइज एंट्री.’ यासोबतच लिहिलंय, की सुपर स्पेशल क्षण पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत.

लोक म्हणाले, दिवसाचा व्हिडिओ बनवला 14 डिसेंबरला इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. आतापर्यंत तो 2 लाख 24 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. ही संख्या सातत्यानं वाढतेय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक नववधूचं कौतुक करत आहेत. यावर एका यूजरने कमेंट करताना लिहिलं, की ‘इन्स्टाग्रामवर वधूच्या एन्ट्रीच्या व्हिडिओंमध्ये मी पाहिलेला हा सर्वोत्तम आहे’. दुसऱ्या यूझरचं म्हणणं आहे, की या सुंदर क्षणाच्या व्हिडिओनं त्याचा दिवस बनवला. एकूणच या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे.

Viral Video : वृद्ध महिलेकडून स्ट्रॉबेरी विकत घेणाऱ्याचं सोशल मीडियावर होतंय कौतुक, काय केलं असं? पाहा व्हिडिओ

कतरिना, करीना हिच्यापुढं सगळ्या फिक्या, अस्सल अहिराणी गाण्यावरचा 20 सेकंदाचा हा Video पुन्हा पुन्हा पहाल

नोरा फतेही आणि गुरू रंधावाच्या गाण्यावर थिरकली शाळकरी मुलगी, 19 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय Naach Meri Raniचा हा Video

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.