Highest Paid TV Host In India: ना सलमान, ना बिग बी… हा आहे सर्वात महागडा टीव्ही होस्ट
Highest Paid TV Host In India: सलमान खान किंवा अमिताभ बच्चन नव्हे, तर यावर्षी टीव्हीवर पदार्पण करणारा एक स्टार व्यक्ती छोट्या पडद्यावरील सर्वात महागडा होस्ट ठरला आहे.

जेव्हाही भारतीय टेलिव्हिजनच्या सर्वात महागड्या होस्टची चर्चा होते, तेव्हा प्रत्येकाच्या मनात सर्वात आधी दोनच नावे येतात ‘बिग बॉस’चा होस्ट सलमान खान किंवा ‘कौन बनेगा करोडपती’चे होस्ट महानायक अमिताभ बच्चन. वर्षानुवर्षे छोट्या पडद्यावर फी आणि स्टारडमच्या बाबतीत या दोन दिग्गजांचेच वर्चस्व मानले जात होते. पण आता या यादीत एक अत्यंत चकित करणारे नाव जोडले गेले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ना सलमान खान आणि ना अमिताभ बच्चन, तर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा टेलिव्हिजनचा सर्वात महागडा होस्ट म्हणून समोर आला आहे.
क्रिकेटच्या मैदानावर षटकारांचा पाऊस पाडणारा ‘हिटमॅन’ रोहित शर्माने सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचा शो ‘फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा’च्या माध्यमातून टेलिव्हिजन होस्टिंगच्या जगात पाऊल ठेवले आहे. इंडस्ट्रीच्या सूत्रांनुसार, रोहित शर्मा या शोचा प्रत्येक एपिसोडला होस्ट करण्यासाठी १० ते १५ कोटी रुपये फी घेतो. जर हा आकडा खरा असेल, तर रोहित शर्माने आपल्या पहिल्याच टीव्ही शोमध्ये फीच्या बाबतीत बॉलिवूडच्या मोठमोठ्या सुपरस्टार्सना मागे टाकून नंबर-१ ची खुर्ची आपल्या नावावर केली आहे. मात्र त्याच्या फीबाबत रोहित किंवा चॅनेलपैकी कोणीही अधिकृतपणे माहिती दिलेली नाही.
सलमान खान आणि अमिताभ बच्चन एका एपिसोडसाठी किती घेतात?
मीडिया रिपोर्ट्सवर नजर टाकल्यास, बॉलिवूडच्या दिग्गज होस्ट्सची फीही कमी चकित करणारी नाही.
सलमान खान : रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा जीव मानला जाणारा सलमान खानची फी नेहमीच चर्चेत असते. अंदाजानुसार, सलमान खान प्रति एपिसोड सुमारे ८ ते १० कोटी रुपये चार्ज करतो.
अमिताभ बच्चन : सन २००० पासून ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) ची हॉट सीट सांभाळणारे महानायक अमिताभ बच्चन यांची फी रिपोर्ट्सनुसार २.५ ते ३ कोटी रुपये प्रति एपिसोडच्या आसपास राहिली आहे.
भारतातील इतर टॉप टीव्ही आणि ओटीटी होस्ट्सची फी
रोहित शर्मा, सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्याशिवायही छोट्या पडद्यावर आणि ओटीटीवर अनेक चर्चित होस्ट्स आहेत, जे मोठी फी घेतात.
कपिल शर्मा : कॉमेडी किंग कपिल शर्मा नेटफ्लिक्सचा शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’साठी सुमारे ५ कोटी रुपये चार्ज करतो. याआधी सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा शो’च्या शेवटच्या सीझनमध्ये त्याची फी १ कोटी प्रति एपिसोड सांगितली जात होती.
करण जोहर : चर्चित सेलिब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण’चा होस्ट करण जोहर २ ते ३ कोटी रुपये प्रति एपिसोड घेतो.
रोहित शेट्टी : अॅडव्हेंचर रियलिटी शो ‘खतरों के खिलाड़ी’ होस्ट करण्यासाठी फिल्ममेकर रोहित शेट्टीची फी सुमारे १ ते दीड कोटी प्रति एपिसोड असल्याचे सांगितले जाते.
भारती सिंह : ‘लाफ्टर शेफ्स’ आणि अनेक रियलिटी शोची होस्ट भारती सिंह १० ते १२ लाख रुपये प्रती एपिसोड चार्ज करते.
