AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Yojana: एकत्र कुटुंब, चार भावांमध्ये कुणाला मिळेल पीएम किसानचा हप्ता? नियम वाचला का?

PM Kisan Yojana Rules: पंतप्रधान किसान योजनेचा 24 वा हप्ता काही शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाला नाही. संयुक्त कुटुंबातील कोणत्या सदस्यांना हप्ता मिळतो. चार भाऊ असतील तर कोणत्या भावाला या योजनेचा लाभ मिळेल. याविषयीचा काय नियम आहे?

PM Kisan Yojana: एकत्र कुटुंब, चार भावांमध्ये कुणाला मिळेल पीएम किसानचा हप्ता? नियम वाचला का?
चार भावांमध्ये कुणाला मिळेल पीएम किसानचा हप्ता? नियम वाचला का?
| Updated on: Nov 14, 2026 | 9:56 AM
Share

PM Kisan Yojana Rules: पंतप्रधान किसान योजनेत शेतकर्‍यांना वर्षाला 6,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. वर्षातून तीन हप्ते थेट बँक खात्यात जमा होतात. प्रत्येकी 2 हजारांची मदत देण्यात येते. या योजनेतंर्गत आतापर्यंत 24 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. काही शेतकर्‍यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही. पण संयुक्त कुटुंबातील कोणत्या सदस्यांना हप्ता मिळतो. चार भाऊ असतील तर कोणत्या भावाला या योजनेचा लाभ मिळेल. याविषयीचा काय नियम आहे?

25 वा हप्ता कधी जमा होणार?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 25 वा हप्ता आता पुढील वर्षी मिळेल. या योजनेचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोबर 2026 रोजी वितरीत करण्यात आला. या योजनेत हप्ते वितरीत करण्याची पद्धत पाहता, दर चार महिन्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता जमा करण्यात येतो. त्यानुसार, 25 वा हप्ता फेब्रुवारी 2027 मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. याविषयीची अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही.

संयुक्त कुटुंबात कोणाला फायदा?

पीएम किसान योजनेबद्दल एक महत्त्वाचा प्रश्न आहे. संयुक्त कुटुंबात चार अथवा त्यापेक्षा अधिक भाऊ असतील तर या योजनेचा हप्ता कुणाला मिळेल? चार भाऊ जर एकाच घरात राहत असतील आणि एकत्रित कुटुंब असेल तर 6,000 रुपयांचा वार्षिक हप्ता कुणाला मिळेल? एका भावाला फायदा होईल की, चारही भावाला फायदा होईल? कुटुंबाचा दर्जा आणि शेतजमिनीचा मालक कोण आहे यावर हे गणित अवलंबून असते.

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या नियमानुसार, शेतकरी कुटुंबात पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांचा समावेश होते. केवळ एकाच घरात राहतात. अडनाव सारखे आहे म्हणून सर्व भाऊ शेतकरी कुटुंब ग्राह्य धरल्या जात नाही. जर प्रत्येक सदस्याच्या, भावाच्या नावावर लागवडीयोग्य जमीन असेल तर पीएम किसान योजनेचा लाभ घेता येतो. या चारही भावांना प्रत्येकी 6,000 रुपयांचा वार्षिक लाभ मिळू शकतो. चारही भाऊ या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. म्हणजे जमिनीची मालकी वेगळी असेल तर एकाच कुटुंबात चार भावांना एकत्रित 24,000 रुपयांचा लाभ मिळेल.

Follow Us
पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम....
Pune : पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम चित्रपटाच्या शूटिंगवरून नवा वाद
करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली
Karuna Munde : करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळ यांची घेतली भेट; चर्चांना उधाण
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं?
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं? मुंबई महापालिकेतील बैठकीवरून नवा राजकीय वाद
राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान...
Gunaratna Sadavarte On Raj Thackeray : राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान
दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा..
NCP : दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, मुंबईत सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?
पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि....
Pune-Solapur Highway : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि प्रवासी जखमी; वाहतुकीचा खोळंबा
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल