Amitabh Bachchan : तो बंगला माझाच.. ‘जलसा’वरून अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबीयांवर मोठा आरोप; वहिनीचा खळबळजनक दावा
Amitabh Bachchan : बच्चन कुटुंब सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. कारण महानायक अमिताभ बच्चन यांच्या वहिनीने खळबळजनक दावा केला. 'जलसा' या बंगल्यावर माझाच हक्क आहे... असा वहिनींना दावा केला आहे. ज्या बंगल्यावरुन सध्या वाद सुर आहेत त्या बंगल्यात अमिताभ बच्चन त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत आहेत.

Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता बिग बी कौटुंबिक कारणामुळे चर्चेत आले आहे. सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन आणि त्यांच्या मुलांबद्दल आज सर्वांना माहिती आहे. पण त्यांचा लहान भाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल फार कोणाला माहिती नाही. आता बिग बीचं लहान भाऊ अजिताभ बच्चन यांच्या पत्नी रमोला बच्चन यांनी मोठा दावा केला आहे. समोर आलेल्या माहितीनूसार, ‘जलसा’ बंगल्यावर माझा हक्क असल्याचा दावा रमोला बच्चन यांनी केला आहे, याप्रकरणी तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. रमोला बच्चन यांचं असं म्हणणं आहे की, ज्या कागदपत्रांच्या आधारावर मालकीहक्क बदलण्यात आले आहेत, त्याबद्दल त्यांनी कधी काही सांगण्यातच आलं नाही.
1993 मध्ये सुरु झाला वाद
रिपोर्टनुसार, संबंधित प्रकरण 1993 मधील आहे. तेव्हा एक ‘गिफ्ट डीड’ तयार करण्यात आलं होचं. ज्यामध्ये असं दाखवण्यात आलं होतं की, रमोला बच्चन यांनी ‘जलसा’ बंगला जया बच्चन यांच्या नावावर केला आहे. पण, त्या कागदपत्रांबद्दर रमोला यांना काहीच माहिती नव्हतं. त्यांनी बंगला कधी दुसऱ्याला देण्याची परवानगी दिलीच नव्हती आणि त्यावर कोणते कागदपत्र देखील तयार केले नव्हते.
2006 मध्ये हटवण्यात आलं रमोला यांचं नाव
2006 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या ‘अभय योजने’ अंतर्गत हा गिफ्ट डीड रजिस्टर करण्यात आला होता. या योजनेत जुन्या कागदपत्रांवर लागणाऱ्या स्टॅम्प ड्युटी आणि दंडामध्ये सूट दिली जात असे. दस्तऐवज नोंदणी झाल्यानंतर हाऊसिंग सोसायटीच्या रेकॉर्डमधून रमोला यांचं नाव काढून जया बच्चन यांचं नाव नोंदवण्यात आलं. एवंढच नाही तर, हाऊसिंग सोसायटीच्या रेकॉर्डमध्ये जरी जया बच्चन यांचे नाव नोंदवलं गेलं असलं, तरी सरकारी प्रॉपर्टी कार्डवर अद्यापही रमोला बच्चन यांचंच नाव आहे. रिपोर्टनुसार, 2026 मध्ये सरकारी रेकॉर्डवरूनही त्यांचं नाव हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर रमोला यांनी फेब्रुवारी ते ऑक्टोबर दरम्यान अर्ज दाखल केले आणि संबंधित विभागांमध्ये तक्रारी नोंदवल्या.
संबंधित प्रकरणी सुनावणी सुरु…
समोर आलेल्या माहितीनुसार, अंधेरी येथील को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे डेप्युटी रजिस्ट्रार यांनी या प्रकरणाची सुनावणी सुरू केली आहे. त्यांनी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याकडूनही स्पष्टीकरण मागवलं आहे. दुसरीकडे, 2006 मध्ये साध्या कागदावर तयार केलेलं गिफ्ट डीड ‘अभय योजने’अंतर्गत कसं स्वीकारलं गेलं, याचा तपास पुण्याचा नोंदणी विभाग करत आहे.
अभिषेक बच्चन यांच्या प्रवक्त्यांनी काय म्हटलं?
या संपूर्ण वादावर अद्याप अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान, जेव्हा अभिषेक बच्चन यांच्या प्रवक्त्यांना याबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी हा कुटुंबाचा वैयक्तिक मामला असल्याचे सांगत यावर काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला.
