कतरिना, करीना हिच्यापुढं सगळ्या फिक्या, अस्सल अहिराणी गाण्यावरचा 20 सेकंदाचा हा Video पुन्हा पुन्हा पहाल

कतरिना, करीना हिच्यापुढं सगळ्या फिक्या, अस्सल अहिराणी गाण्यावरचा 20 सेकंदाचा हा Video पुन्हा पुन्हा पहाल
'देख तुनी बायको'चं लिपसिंक

यूट्यूब(Youtube)वर सध्या एक गाणं तुफान हिट झालंय. ते म्हणजे, देख तुनी बायको (Dekh Tuni Bayko) कशी नाची ऱ्हायनी, कशी कुदी ऱ्हायनी, कशी डोली ऱ्हायनी.. अहिराणी (Ahirani ) भाषेतल्या या गाण्यानं सध्या धुमाकूळ घातलाय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Jan 07, 2022 | 3:52 PM

मुंबई : यूट्यूब(Youtube)वर सध्या एक गाणं तुफान हिट झालंय. ते म्हणजे, देख तुनी बायको (Dekh Tuni Bayko) कशी नाची ऱ्हायनी, कशी कुदी ऱ्हायनी, कशी डोली ऱ्हायनी.. अहिराणी (Ahirani ) भाषेतल्या या गाण्यानं सध्या धुमाकूळ घातलाय. एखादं गाणं हिट झाल्यानंतर त्याचे रिक्रिएशन होतात. मग अशी गाणी सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral)व्हायला लागतात.

प्रतिभेला फुटले धुमारे…

देख तुनी बायको, हे गाणंही असंच काहीसं आहे. याचे व्हेरिएशन आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. तर अनेक यूझर्स आपल्या पोस्टमधून अशा रिक्रिएशनचे व्हिडिओ पोस्ट करत आहेत. असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. एक कलाकार या गाण्यावर लिपसिंक करतानाचा हा व्हिडिओ आहे. श्रुतिका गावंडे हिनं हे लिपसिंग केलंय.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shrutika Gawande (@shrutikavlogs)

गाण्यातली कलाकार यूट्यूबर

या गाण्यातली कलाकार ही एक यूट्यूबर असून श्रुतिका गावंडे असं तिचं नाव आहे. यूट्यूबवर ती आपले विनोदी आणि विविध विषयांवर व्हिडिओ अपलोड करत असते. तर इन्स्टावर तिचं श्रुतिकाव्ह्लॉग्स म्हणून अकाऊंट आहे. सोशल मीडियावर ती सक्रिय असून आता तिनं आता या हिट गाण्यावरच्या लिपसिंकचा व्हिडिओ तयार केलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shrutika Gawande (@shrutikavlogs)

मूळ गाणं झालंय हिट

मूळ अंजना बरलेकर यांनी हे गाणं लिहिलं असून त्यांनीच ते गायलं आहे. जगदीश संधानशीव यांनी त्यांना गायनात साथ दिलीय. याला दिनेश बाशिंगे यांनी संगीत दिलंय. जूनमध्ये हे गाणं यूट्यूबवर रिलीज करण्यात आलं. आतापर्यंत त्याला 26 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळालेत आणि झपाट्यानं ते गाणं व्हायरल आणि शेअर होतंय. या गाण्यावर यूझर्सच्या कमेंट्सही भरपूर पाहायला मिळतायत. हे गाणं लोकांना खूप आवडलंय. असं गाणं दिल्याबद्दल कलाकारांचं अभिनंदनही यूझर्स करतायत. तर खाणदेशी नागरिकांनी तर या गाण्याला अक्षरश: उचलून धरलंय. मूळ गाणंही पाहू शकता.. (सौजन्य – अंजना बरलेकर)

 

नोरा फतेही आणि गुरू रंधावाच्या गाण्यावर थिरकली शाळकरी मुलगी, 19 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय Naach Meri Raniचा हा Video

Viral : ट्रेनमध्ये बिनधास्त झोपताय का? रेल्वेच्या डब्यातला हा Video पाहा, हसून हसून पोट दुखेल

Jawed Habib Contro Video : आधी डोक्यावर पचकन थुंकला आणि आता जावेद हबीब म्हणतो…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें