Viral : ट्रेनमध्ये बिनधास्त झोपताय का? रेल्वेच्या डब्यातला हा Video पाहा, हसून हसून पोट दुखेल

Viral : ट्रेनमध्ये बिनधास्त झोपताय का? रेल्वेच्या डब्यातला हा Video पाहा, हसून हसून पोट दुखेल
रेल्वेडब्यात झोपलेला प्रवासी

एका माणसाला त्याच्या सीटवर झोपताना स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि गाढ झोपेत तो सीटवरून खाली पडला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) झालाय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Jan 07, 2022 | 11:26 AM

ट्रेन(Train)मधील प्रवासादरम्यान तुम्ही अनेकदा अनेकांना खिडकीच्या सीटसाठी भांडताना पाहिले असेल. खरं तर, काही लोकांना थंड हवेसह ट्रेनच्या बाहेरचं दृश्य पाहणं आवडतं. मात्र, काही लोक झोप घेऊन टाइमपास करण्यावर विश्वास ठेवतात. यापैकी काहींना अशी तंद्री येते, जी इतर प्रवाशांनाही त्रासदायक ठरते. त्याचवेळी काहींसोबत अशी घटना घडते, की त्यांनाही ते सहन करावं लागतं. आता एका माणसाला त्याच्या सीटवर झोपताना स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि गाढ झोपेत तो सीटवरून खाली पडला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) झालाय. हा पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

काय होणार माहीत नसतं! हा व्हायरल व्हिडिओ ट्रेनच्या सर्वसाधारण बोगीमध्ये शूट करण्यात आलाय. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की प्रवासी त्यांच्या सीटवर बसलेले आहेत, तर काही लोक उभे असल्याचंदेखील दिसतंय. यादरम्यान एक प्रवासी गाढ झोपेत असल्याचं दिसून येतंय. पुढच्याच क्षणी त्याचं काय होणार आहे याची त्याला कल्पना नसते. यानंतर, तो झोपेतच डुलकी घेतो आणि धक्क्यानं खाली पडतो. मग काय? त्या माणसाची झोप उडाली आणि ‘मी कुठं आहे…’ असा फील आला. हे पाहून आजूबाजूचे लोकही काय झालं म्हणून घाबरले. पुढच्या काकांचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे आहेत. चला मग आधी हा व्हिडिओ पाहू या…

View this post on Instagram

A post shared by sayyam_pi (@sayyyam_pi)

इन्स्टावर शेअर हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर sayyyam_pi नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ६ डिसेंबर रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओ धमाल उडवून देणाराय. लोकांना हा व्हिडीओ किती आवडलाय, याचा अंदाज यावरून लावता येतो, की आतापर्यंत 1 लाख 64 हजारांहून अधिक लोकांनी याला लाइक केलंय. ही संख्या सातत्यानं वाढतेय. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात.

टॅग होतोय व्हिडिओ व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरनं लिहिलंय, की, ‘भावांनो, नीट बघा, जे सगळीकडे झोपतात त्यांच्यासोबत असं होऊ शकतं.’ त्याचवेळी आणखी एका यूझरनं त्याच्या मित्राला टॅग करत लिहिलंय, ‘बघा, कोणीतरी तुमच्यासारखंच झोपतंय.’ दुसर्‍या यूझरनं त्याच्या मित्राला कमेंट सेक्शनमध्ये टॅग केलं आणि त्याला सल्ला दिला, ‘पुढच्या वेळी झोपण्यापूर्वी हा व्हिडिओ लक्षात ठेव.’ एकूणच, हा व्हिडिओ सोशल मीडिया यूझर्सना खूप आवडलाय. प्रत्येकजण त्यांच्या कमेंटमध्ये कोणालातरी टॅग करून हा व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवतोय.

Video : ओह..! सोशल मीडियावर Viral होत असलेला व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही गोंधळून जाल

Jawed Habib Contro Video : आधी डोक्यावर पचकन थुंकला आणि आता जावेद हबीब म्हणतो…

Viral : …आणि जोडपं पडलं चिखलाच्या खड्ड्यात! नेमकं घडलं तरी काय? नेटिझन्स म्हणतायत…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें