Jawed Habib Contro Video : आधी डोक्यावर पचकन थुंकला आणि आता जावेद हबीब म्हणतो…

Jawed Habib Contro Video : आधी डोक्यावर पचकन थुंकला आणि आता जावेद हबीब म्हणतो...
जावेद हबीब

सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब (Jawed Habib)नं मागितली माफी मागितलीय. हेअर स्टाइल सेमिनारच्या दरम्यान महिलेच्या केसात थुंकल्याप्रकरणी त्यानं माफी मागितलीय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Jan 07, 2022 | 11:11 AM

मुंबई : सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब (Jawed Habib)नं मागितली माफी मागितलीय. हेअर स्टाइल सेमिनारच्या दरम्यान महिलेच्या केसात थुंकल्याप्रकरणी त्यानं माफी मागितलीय. सेमिनार सुरू असताना महिलेची हेअर स्टाइल करताना तो केसात थुंकला. महिलेनं याबाबत आक्षेप घेत व्हिडिओ केला. तो व्हायरल झाल्यानंतर त्यानं माफी मागितलीय.

View this post on Instagram

A post shared by Jawed Habib (@jh_hairexpert)

काय होतं प्रकरण?

प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब(Jawed Habib)चा एक व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल झाला होता. यात तो एका महिलेचे केस कापताना दिसत होता. हा व्हिडिओ व्हायरल (Viral) झाला. जावेद हबीबनं थुंकून (Spitting) केस कापल्याचा आरोप महिलेनं केलाय.

मुजफ्फरनगरमधला प्रकार

हा व्हिडिओ मुजफ्फरनगरचा होता. व्हिडिओमध्ये जावेद हबीब एका महिलेला केस कापण्यासाठी बोलावतो. केस कापताना तो म्हणतो, ‘माझे केस घाणेरडे आहेत, का घाणेरडे आहेत, तर मी शाम्पू लावला नाही. नीट ऐका… पाण्याची कमतरता असेल तर… या थुंकीत प्राण आहे’. यावेळी तिथं उपस्थित असलेल्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. मात्र ज्या महिलेचे केस कापले जात आहेत, ती मात्र कम्फर्टेबल नव्हती. आता या महिलेची प्रतिक्रियाही आलीय. काल व्हायरल झालेला आणि वादग्रस्त हाच तो व्हिडिओ…

वादानंतर स्पष्टीकरण

माझे सेमिनार प्रोफेशनल स्तरावरचे असतात. ते मोठे असतात. ते अधिक इंटरेस्टिंग करण्यासाठी अशाप्रकारे काही बाबी कराव्या लागतात. मात्र त्या सेमिनारमध्ये वापरलेल्या काही शब्दांवरून काही जण दुखावले गेले. त्याबद्दल मी माफी मागतो, असं तो म्हणाला. दिल से माफी मांगता हूँ. माफ करो ना, असा व्हिडिओ त्यानं इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय.

Video : जावेद हबीबनं केस कापताना हे काय केलं? महिला संतापली, म्हणाली…

Video : ओह..! सोशल मीडियावर Viral होत असलेला व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही गोंधळून जाल

Nagpur Crime | कुत्रे यायचे खायला, धाब्याच्या मालकाला आला राग; तीन कुत्र्यांच्या पिल्लांवर उगवला सूड!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें