AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात महिलाराज, 29 पैकी 15 महापालिकांची सूत्र महिलांच्या हाती, तुमचा महापौर कोण?

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले असून मुंबई, पुणे आणि नागपूरसह १५ शहरांत आता महिला राज पाहायला मिळणार आहे. ५० टक्के महिला आरक्षण धोरणामुळे अनेक दिग्गज पुरुष नेत्यांची कोंडी झाली असून राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

महाराष्ट्रात महिलाराज, 29 पैकी 15 महापालिकांची सूत्र महिलांच्या हाती, तुमचा महापौर कोण?
Maharashtra Mayor Reservation
| Updated on: Jan 22, 2026 | 1:37 PM
Share

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौरपदाच्या आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. आज मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही सोडत पार पडली. या सोडतीत ५० टक्के महिला आरक्षणाच्या धोरणानुसार यंदा २९ पैकी १५ शहरांमध्ये महिला महापौर विराजमान होणार आहेत. यामुळे राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक या चारही मोठ्या शहरांमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे या शहरांना आता महिला महापौर मिळणार आहे. यामुळे राज्यातील प्रमुख शहरांच्या विकासाची सूत्रे महिलांच्या हाती असतील. महाराष्ट्रात तब्बल १५ महिला महापौर होणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात महिला राज पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे मुंबई, नागपूर, नाशिकसह मोठ्या शहरांची धुरा महिलांकडे असणार आहे.

महिलांसाठी राखीव पदे (एकूण १५ जागा)

सर्वसाधारण महिला (Open Women): मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, धुळे, मिरा-भाईंदर, मालेगाव, सोलापूर

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (OBC Women): अहिल्यानगर, जळगाव, अकोला, चंद्रपूर.

अनुसूचित जाती महिला (SC Women): लातूर, जालना.

पुरुष/खुला प्रवर्ग (एकूण १४ जागा)

  • सर्वसाधारण खुला (General Open): छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नवी मुंबई, अमरावती, परभणी, सांगली-मिरज-कुपवाड, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड
  • इतर मागास प्रवर्ग खुला (OBC Open): उल्हासनगर, पनवेल, कोल्हापूर, इचलकरंजी
  • अनुसूचित जाती/जमाती खुला (SC/ST Open): ठाणे (SC), कल्याण-डोंबिवली (ST)

विभागीय चित्र काय?

मुंबई आणि नवी मुंबईत महिला राज असणार आहे. तर ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये खुला प्रवर्गाला संधी मिळेल. पुणे आणि सोलापूरमध्ये महिला महापौर असतील, तर पिंपरी-चिंचवड आणि सांगलीत खुला प्रवर्ग असेल. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि मालेगाव अशा चारही प्रमुख शहरांत महिलांचे वर्चस्व राहणार आहे. तसेच नागपूर, अकोला आणि चंद्रपूरमध्ये महिला महापौर असतील, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये खुला प्रवर्ग निश्चित झाला आहे.

दरम्यान निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन चित्र स्पष्ट झालेले असतानाच आता महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने अनेक महापालिकांमधील राजकीय गणिते पूर्णपणे उलटपालट झाली आहेत. अनेक वर्षांपासून महापौरपदाचे स्वप्न पाहणाऱ्या आणि निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या दिग्गज पुरुष नेत्यांची या आरक्षणाने मोठी कोंडी केली आहे. विशेषतः मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या शहरांत सत्ता समीकरणे जुळवताना आता खमक्या महिला नेतृत्वाची शोधमोहीम पक्षपातळीवर वेगाने सुरू झाली आहे.

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.