AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजबच घडलं! मृतदेह समोर नसतानाही डॉक्टरने पोस्टमार्टम केलं, खाजगी डिटेक्टिव्हने उघड केलं सत्य, काय घडलं

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका सरकारी डॉक्टरने मृतदेह समोर नसताना पोस्टमार्टम केलं. त्याचा रिपोर्टही समोर आला आहे. आता नेमकं काय झालं वाचा...

अजबच घडलं! मृतदेह समोर नसतानाही डॉक्टरने पोस्टमार्टम केलं, खाजगी डिटेक्टिव्हने उघड केलं सत्य, काय घडलं
Doctor CrimeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 09, 2026 | 5:29 PM
Share

जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्यावर दुचाकीस्वाराचा अपघात होऊन मृत्यू झाल्याचा बनाव करून ५० लाख रुपयांचा विमा मिळवण्याचा कट उघडकीस आला आहे. या प्रकरणात मृताच्या कुटुंबीयांसह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि मेहुनबारे पोलिस ठाण्यातील चार पोलिस कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसात खाजगी विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार राजेंद्र शालिंदर जाधव यांच्या कथित अपघाती मृत्यूबाबत श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे ५० लाख रुपयांच्या पर्सनल एक्सीडेंट विम्याचा दावा पत्नी अरुणा जाधव यांनी केला होता. दावा करताना १९ एप्रिल २०२५ रोजी रात्री दहिवद येथून मालेगावकडे जात असताना मोटरसायकलला काळ्या रंगाच्या थार वाहनाने धडक दिल्याने जाधव जखमी होऊन चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते. यावेळी चाळीसगाव ग्रामीण येथील डॉक्टरांनी कुठलाही मृतदेह समोर नसताना पोलिसांनप्राथमिक अहवालसह पोस्टमार्टम रिपोर्ट दिला होता.

त्यानंतर याप्रकरणी मेहुनबारे पोलिस ठाण्यात एफआयआर क्र. ८६/२०२५ अशी नोंदही करण्यात आली होती. मात्र विमा कंपनीने एका खाजगी डिटेक्टिव्ह एजन्सीकडून चौकशी केल्यानंतर मोठ्या विसंगती आढळल्या. तपासात राजेंद्र जाधव यांचा प्रत्यक्ष मृत्यू २३ फेब्रुवारी २०२४ रोजी यकृताच्या गंभीर आजाराने झाल्याचे समोर आले. चौकशीदरम्यान त्यांच्या घरात लावलेल्या फोटोवरही मृत्यूची तारीख २३ फेब्रुवारी २०२४ अशी नमूद असल्याचे आढळले. तसेच ग्रामपंचायत मृत्यू नोंदणी रजिस्टरमध्येही त्यांची नोंद नसल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले. याशिवाय मृताच्या कागदपत्रांमध्ये वेगवेगळे पत्ते असल्याचे तसेच त्यांच्या नावावर इतर सुमारे १० विमा कंपन्यांकडूनही पॉलिसी घेण्यात आल्याचे समोर आले. यावरून अपघात व मृत्यूची संपूर्ण बनावट कथा तयार करून विमा रक्कम मिळवण्याचा कट रचल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणात अरुणा राजेंद्र जाधव, संभाजी जाधव, थार वाहनाचा चालक-मालक, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर तसेच मेहुनबारे आणि चाळीसगाव पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महेंद्र पाटील, सुनील निकम, रवींद्र बत्तीसे, सचिन निकम, तसेच विमा एजंट प्रवीण पाटील, प्रेम पाटील आणि मयताचा भाऊ मिथुन जाधव यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेमुळे बनावट पद्धतीने विमा रक्कम मिळवून देणारी टोळी उघडकीस आली असून या प्रकरणात साधारणतः विविध विमा कंपन्यांकडून तब्बल साडेसात कोटी रुपयांची रक्कम हडपण्याचा प्रयत्न झाल्याचे देखील समोर आले आहे.

Follow Us
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?