AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! युद्धात इस्त्रायलकडून झाली मोठी चूक, ट्रम्प प्रचंड भडकले, आता अमेरिका- इस्त्रायल आमने-सामने

मध्य पूर्वेत भीषण युद्ध सुरू आहे, अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. मात्र आता युद्ध सुरू असताना इस्त्रायलकडून मोठी चूक झाली आहे, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प चांगलेच संतापले आहेत.

मोठी बातमी! युद्धात इस्त्रायलकडून झाली मोठी चूक, ट्रम्प प्रचंड भडकले, आता अमेरिका- इस्त्रायल आमने-सामने
Trump, NetanyahuImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 09, 2026 | 5:40 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, आज युद्धाचा 10 दिवस आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर भीषण हल्ले सुरू आहेत, या हल्ल्यांमध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराणने देखील अमेरिका आणि इस्त्रायलला तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं आहे, इराणकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये आता अमेरिका आणि इस्त्रायलचं देखील मोठं नुकसान झालं आहे. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर भीषण हल्ला करण्यात आला होता, या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आज आता इराणकडून आपल्या नव्या सर्वोच्च नेत्याची निवड करण्यात आली आहे.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता मध्य पूर्वेतून एक मोठी बातमी समोर आली आहे,  ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प इस्त्रायलवर चांगलेच नाराज झाले आहेत. युद्ध सुरू असताना इस्त्रायलने इराणमधील तेला साठ्यांना लक्ष्य केलं. यावरून अमेरिकेनं चांगलाच संताप व्यक्त केला आहे. इस्त्रायलने एवढी टोकाची भूमिका घ्यायला नको, यामुळे युद्ध आणखी भडकेल अशा शब्दात अमेरिकेनं इस्त्रायला सुनावलं आहे. तेलाच्या साठ्यांवर जर हल्ला केला तर त्याचा त्रास हा सर्वसामान्य लोकांना होऊ शकतो असंही अमेरिकेनं इस्त्रायला म्हटलं आहे.

एका रिपोर्टानुसार इस्रायलकडून इराणच्या तेल डेपोला लक्ष्य करण्यात आल्यानंतर अमेरिकेनं नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला इस्त्रायलकडून एवढ्या भीषण हल्ल्याची अपेक्षा नव्हती. हे हल्ले चुकीचे आहेत, असं अमेरिकेनं म्हटलं आहे. तर अमेरिकेकडून आलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक असल्याचं इस्त्रायने म्हटलं आहे. त्यामुळे आता अमेरिका आणि इस्त्रायल आमने-सामने आल्याचं चित्र आहे.

युद्धाचा दहावा दिवस 

आज युद्धाचा दहावा दिवस आहे. गेल्या दहा दिवसांपासून मध्य पूर्वेत भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये तीनही देशांचं मोठं नुकसान झालं आहे. सर्वाधिक नुकसान हे इराणचं झालं आहे. मात्र इस्त्रायलकडून आता इराणच्या तेल साठ्यांवर हल्ला करण्यात आल्यानं अमेरिका चांगलीच नाराज झाली आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल