AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणाला लॉटरी, कोणाला धक्का… तुमच्या शहराचा महापौर कोण? आरक्षणाची सोडत जाहीर, पाहा संपूर्ण यादी

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आज मंत्रालयात महापौरपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. कल्याण-डोंबिवलीचे महापौरपद अनुसूचित जमातीसाठी तर ठाणे आणि लातूरमध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण जाहीर झाले आहे.

कोणाला लॉटरी, कोणाला धक्का... तुमच्या शहराचा महापौर कोण? आरक्षणाची सोडत जाहीर, पाहा संपूर्ण यादी
Maharashtra Municipal Election Results
| Updated on: Jan 22, 2026 | 1:16 PM
Share

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेली महापौरपदाची आरक्षण सोडत आज मंत्रालयात अखेर पार पडली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात १५ जानेवारीला मतदान पार पडले होते. त्यानंतर १६ जानेवारीला निकाल जाहीर झाला आहे. या सोडतीमुळे अनेक महापालिकांमध्ये कोणत्या पक्षाचा महापौर बसणार याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

या आरक्षण सोडतीमुळे राज्यातील अनेक मोठ्या शहरांमधील सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. विशेषतः महिला आरक्षणामुळे अनेक दिग्गज नेत्यांना आपल्या प्रभागातील नियोजनात मोठे बदल करावे लागणार आहेत.

आरक्षणाचे सविस्तर गणित

मंत्रालयात झालेल्या या सोडतीनुसार 29 महापालिकांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करण्यात आले आहे

  • अनुसूचित जाती (SC) : 3 महापालिका
  • अनुसूचित जमाती (ST): 1 महापालिका (कल्याण-डोंबिवली)
  • इतर मागासवर्गीय (OBC): ८ महापालिका
  • सर्वसाधारण (खुला प्रवर्ग): १७ महापालिका

या आरक्षण सोडतीमुळे अनेक राजकीय गणिते बदलणार असून, विशेषतः महिला आरक्षणाने अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रभागातील समीकरणे आव्हानात्मक ठरणार आहेत.

विभाग महानगरपालिका आरक्षणाचा प्रवर्ग आरक्षण (महिला/खुला)
कोकण मुंबई (BMC) सर्वसाधारण (Open) महिला
ठाणे अनुसूचित जाती (SC) खुला
नवी मुंबई सर्वसाधारण (Open) महिला
कल्याण-डोंबिवली अनुसूचित जमाती (ST) खुला
उल्हासनगर नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) खुला
मिरा-भाईंदर सर्वसाधारण (Open) महिला
भिवंडी-निजामपूर सर्वसाधारण (Open) खुला
वसई-विरार सर्वसाधारण (Open) खुला
पनवेल नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) खुला
पश्चिम महाराष्ट्र पुणे सर्वसाधारण (Open) महिला
पिंपरी-चिंचवड सर्वसाधारण (Open) खुला
सोलापूर सर्वसाधारण (Open) खुला
कोल्हापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) खुला
सांगली-मिरज-कुपवाड सर्वसाधारण (Open) खुला
इचलकरंजी नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) खुला
उत्तर महाराष्ट्र नाशिक सर्वसाधारण (Open) महिला
अहिल्यानगर नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) महिला
धुळे सर्वसाधारण (Open) महिला
जळगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) महिला
मालेगाव सर्वसाधारण (Open) महिला
मराठवाडा छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण (Open) खुला
नांदेड-वाघाळा सर्वसाधारण (Open) खुला
लातूर अनुसूचित जाती (SC) महिला
परभणी सर्वसाधारण (Open) खुला
जालना (नवनियुक्त) अनुसूचित जाती (SC) महिला
विदर्भ नागपूर सर्वसाधारण (Open) महिला
अमरावती सर्वसाधारण (Open) खुला
अकोला नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) महिला
चंद्रपूर नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) महिला

किती महापालिकेत महिला महापौर असणार?

राज्यातील 29 महानगरपालिकांपैकी एकूण 15 महापालिकांमध्ये महिला महापौर विराजमान होतील. 50 टक्के महिला आरक्षणाच्या नियमानुसार या जागांची विभागणी करण्यात आली असून.  या सोडतीनुसार अहिल्यानगर, जळगाव, अकोला आणि चंद्रपूर या चार शहरांमध्ये ओबीसी महिला महापौर असतील. तर लातूर आणि नवनियुक्त जालना महानगरपालिकेत अनुसूचित जाती (SC) महिला प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झाले आहे. या निर्णयामुळे अनेक प्रस्थापित पुरुष नेत्यांना माघार घ्यावी लागणार असून, राजकीय पक्षांना आता महिला उमेदवारांच्या शोधासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच