AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरीत अडचणी, प्रमोशनमध्ये अडथळे… करिअरमध्ये प्रगतीसाठी शुभ मानली जातात ‘ही’ 4 रत्ने

Gemstones for Career: नोकरी आणि करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी मेहनती सोबतच ग्रहांची स्थितीही महत्त्वाची मानली जाते. रत्नशास्त्रानुसार काही विशिष्ट रत्ने धारण केल्याने करिअरमधील अडचणी कमी होऊन प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात. जाणून घ्या कोणती रत्ने फायदेशीर मानली जातात.

नोकरीत अडचणी, प्रमोशनमध्ये अडथळे... करिअरमध्ये प्रगतीसाठी शुभ मानली जातात 'ही' 4 रत्ने
Gemstones for Career
| Edited By: | Updated on: Oct 28, 2026 | 5:44 PM
Share

प्रत्येक व्यक्तीला आपल्या करिअरमध्ये यशस्वी व्हायचे असते. त्यासाठी अनेक जण कठोर मेहनत घेतात. मात्र, कधी कधी खूप प्रयत्न करूनही नोकरीत अपेक्षित यश मिळत नाही किंवा करिअरमध्ये सतत अडथळे येतात. ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीच्या आयुष्यावर ग्रहांच्या स्थितीचा प्रभाव पडतो. कुंडलीतील काही ग्रह कमकुवत असल्यास नोकरी आणि व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी ज्योतिषीय मान्यता आहे. रत्नशास्त्रात काही रत्ने धारण केल्याने ग्रहांची स्थिती मजबूत होऊन करिअरमध्ये सकारात्मक बदल घडू शकतात, असे सांगितले जाते. मात्र, कोणतेही रत्न घालण्यापूर्वी कुंडलीतील ग्रहांची स्थिती तपासणे महत्त्वाचे मानले जाते. जाणून घेऊया करिअरमध्ये प्रगतीसाठी कोणती ४ रत्ने शुभ मानली जातात.

पाचू (पन्ना)

रत्नशास्त्रानुसार, पाचू या रत्नाचा संबंध बुध ग्रहाशी आहे. पाचू धारण केल्याने कुंडलीतील बुध ग्रह मजबूत होतो, असे मानले जाते. विशेषतः नोकरी आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी हे रत्न फायदेशीर मानले जाते. करिअरमधील अडथळे दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात पाचू घालण्याचा सल्ला दिला जातो.

माणिक (माणिक्य)

करिअरमध्ये नेतृत्व क्षमता वाढवण्यासाठी माणिक रत्न शुभ मानले जाते. या रत्नाचा संबंध सूर्य ग्रहाशी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य हा सरकारी नोकरी, मानसन्मान आणि नेतृत्व क्षमतेचा कारक मानला जातो. त्यामुळे माणिक धारण केल्याने सूर्य ग्रह मजबूत होऊन करिअरमध्ये प्रगती होऊ शकते, असे म्हटले जाते.

नीलम

नीलम हे शनि देवांशी संबंधित रत्न मानले जाते. रत्नशास्त्रानुसार, नीलम प्रत्येक व्यक्तीसाठी शुभ ठरतेच असे नाही. मात्र, ज्यांच्या कुंडलीनुसार हे रत्न अनुकूल असते, त्यांना करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते, असे मानले जाते. तसेच नीलम धारण केल्याने शिस्त वाढण्यास आणि आळस दूर होण्यास मदत होते, अशी ज्योतिषीय मान्यता आहे.

पुष्कराज (पुखराज)

पुष्कराज हे देवगुरू बृहस्पती यांच्याशी संबंधित रत्न आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हे रत्न सोन्याच्या अंगठीत बसवून तर्जनीमध्ये धारण करावे. पुष्कराज घातल्याने शिक्षण आणि आर्थिक समस्यांमधून दिलासा मिळू शकतो, असे मानले जाते. तसेच करिअरमध्ये उच्च पद मिळवण्यासाठीही हे रत्न शुभ मानले जाते. रत्न धारण करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

रत्नशास्त्रानुसार, प्रत्येक रत्न धारण करण्यासाठी काही विशिष्ट नियम आणि दिवस सांगितले आहेत. रत्न घालण्यापूर्वी त्याची शुद्धी करणे महत्त्वाचे मानले जाते. यासाठी गंगाजल, दूध आणि मधाचा वापर करण्याची परंपरा आहे. तसेच कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी कुंडलीतील ग्रहांची स्थिती तपासून ज्योतिषतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

( डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा
एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
Ram Purnekar : एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर,
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर, खात्यात किती रुपये होणार जमा?