AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karwa Chauth 2026 : करवा चौथच्या दिवशी किती वाजता होणार चंद्रोदय ? पूजेची वेळ आणि नियमही घ्या जाणून

अखंड सौभाग्य, दांपत्यामधील प्रेम आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलं जाणारं करवा चौथचं व्रत अतिशय महत्वाचं मानलं जातं. या वर्षी पूजेची योग्य वेळ, चंद्रोदय कधी होणार आणि या व्रतासाठीचे नियम काय, ते जाणून घेऊया.

Karwa Chauth 2026 : करवा चौथच्या दिवशी किती वाजता होणार चंद्रोदय ? पूजेची वेळ आणि नियमही घ्या जाणून
| Updated on: Oct 28, 2026 | 5:40 PM
Share

Karwa Chauth Chand Time : हिंदू धर्मात करवा चौथचं व्रत खूप महत्वाचं मानलं जातं. विवाहीत महिलांसाठी हा दिवस अतिशय खास आणि त्या एकदम उत्साहाने हे साजरंही करतात. शारदीय पौर्णिमेनंतर येणारी जी चतुर्थी असते ( आपल्याकडे संकष्टी चतुर्थी) त्या दिवशी हे व्रत असतं. यंदा करवा चौथ, उद्या म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी साजरं केलं जाणार आहे. या विशेष सणाची तिथी, चंद्रदर्शनाची वेळ आणि पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घेणे महत्त्वाचे मानलं जातं. वैवाहिक जीवनात सुख-शांती लाभावी आणि पतीला दीर्घायुष्य मिळावे, यासाठी विवाहित महिला हे व्रत करतात. या दिवशी ज्या व्रत करतात, त्या महिलांनी चंद्रोदयाची वेळ आणि पूजेच्या मुहूर्ताकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या व्रतामुळे वैवाहिक जीवनात प्रेम, सुख आणि समृद्धी टिकून राहते. उद्या चंद्र किती वाजता उगवणार आणि पूजेचा शुभ मुहूर्त कधी ? चला जाणून घेऊया.

करवा चौथ 2026: तिथी, चंद्रोदय आणि पूजेचा शुभ मुहूर्त

तिथी: यंदा करवा चौथचा सण गुरूवार, 29 ऑक्टोबर 2026 रोजी साजरा केला जाणार आहे.

चंद्रोदयाची वेळ : रात्री अंदाजे 8 वाजून 17 मिनिटांनी चंद्रोदय होण्याची शक्यता आहे.

पूजेचा शुभ मुहूर्त : संध्याकाळी 5 वाजून 38 मिनिटांपासून ते 6 वाजून 56 मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असल्याचे सांगितलं जात आहे.

दिल्लीत चंद्रोदयाची वेळ आणि स्थानाचा प्रभाव

करवा चौथच्या दिवशी विवाहित महिला दिवसभर निर्जळ व्रत करतात, पाणीही पीत नाहीत आणि रात्री चंद्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहतात. यंदा दिल्लीत करवा चौथच्या दिवशी रात्री अंदाजे 8 वाजून 17 मिनिटांनी चंद्रोदय होण्याची शक्यता आहे. मात्र, वेगवेगळ्या शहरांतील भौगोलिक परिस्थिती आणि क्षितिजाच्या स्थितीनुसार चंद्रोदयाच्या वेळेत काही मिनिटांचा फरक पडू शकतो. चंद्रोदय झाल्यानंतर महिला चाळणीतून चंद्राचे दर्शन घेतात आणि त्यानंतर पतीचे मुख पाहून व्रत सोडतात. या क्षणाची महिला आतुरतेने वाट पाहत असतात. धार्मिक मान्यतेनुसार, चंद्रदर्शन आणि व्रतपूर्तीला या सणात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या शहरातील चंद्रोदयाची अचूक वेळ जाणून घेणे आवश्यक आहे.

संध्याकाळच्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि विधी

पूजेची तयारी – चंद्रोदयापूर्वी संध्याकाळच्या वेळी करवा माता, भगवान शिव, माता पार्वती आणि श्रीगणेश यांची पूजा केली जाते. या पूजेला करवा चौथच्या व्रतात विशेष महत्त्व आहे.

पूजेचा शुभ मुहूर्त – यंदा संध्याकाळी 5 वाजून 38 मिनिटांपासून ते 6 वाजून 56 मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असल्याचे सांगितले जात आहे. या वेळेत विधीपूर्वक पूजा करण्याची परंपरा आहे.

करवा चौथची कथा आणि आशीर्वाद – पूजेच्या वेळी महिला एकत्र येऊन करवा चौथची कथा ऐकतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, वैवाहिक जीवनातील सुख-शांतीसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना केली जाते.

सौभाग्याच्या वस्तू अर्पण – पूजेदरम्यान करवा मातेला सौभाग्याच्या वस्तू अर्पण केल्या जातात. तसेच दिवा लावून पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते.

सुख-समृद्धीसाठी प्रार्थना – धार्मिक श्रद्धेनुसार, शुभ मुहूर्तावर मनोभावे पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते.

वैवाहिक नात्यातील प्रेम आणि विश्वास – करवा चौथचे व्रत पती-पत्नीमधील प्रेम, विश्वास आणि नात्यातील दृढतेचे प्रतीक मानले जाते. या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतात.

करवा चौथच्या दिवशी विवाहीत महिलांसाठीचे नियम

पतीला दीर्घायुष्य आणि निरोगी जीवन मिळावं यासाठी विवाहीत महिला या दिवशी निर्जळी उपास किंवा व्रत ठेवतात.

या दिवशी त्या पारंपारिक पद्धतीने तयार होऊन, साजशृंगार करून तयार होतात.

संध्याकाळच्या वेळेस सर्व महिला एकत्र येऊन रवा माता, भगवान शिव, माता पार्वती आणि श्रीगणेश यांची पूजा करतात, तसेच कथा ऐकतात.

रात्री चंद्रोदयानंतर च्रंदाचे दर्शन मग पतीचा चेहरा पाहून उपास सोडतात. तेव्हाच हे व्रत पूर्ण होतं.

चंद्राला अर्घ्य दिल्यावर कुटुंबातील सर्व मोठ्य व्यक्तींचा आशीर्वाद, विवाहीत महिला घेतात मग हे व्रत समाप्त होतं.

Follow Us
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा
एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
Ram Purnekar : एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर,
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर, खात्यात किती रुपये होणार जमा?