VIRAL VIDEO : संन्यासाच्या वेशात M.Tech झालेला बाबा व्हायरल, अवतार पाहून तुमचाही बसणार नाही विश्वास
सोशल मीडियावर M.Tech केलेल्या एका इंजिनीअरचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इतकं शिक्षण घेऊनही त्याने घेतलेल्या सन्यासामुळे अनेकांनी आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आजकाल चांगलं शिक्षण घ्यायचं, मोठ्या कंपनीत नोकरी मिळवायची आणि आयुष्यात भरपूर पैसे कमावयचे. अस सर्वांचच स्वप्न असतं. पण एक साधू याला अपवाद निघाला. खूप मेहनत घेतली, शिक्षण पूर्ण केलं आणि भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये कामही केलं पण त्यात काही मन रमलं नाही. या सर्वावर पाणी सोडून कायमचा सन्यास घेतला.त्याची गोष्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये एका प्रवाशाने त्या संन्यासी बाबांची मुलाखत घेतली आहे. त्यावर उत्तर देत त्या संन्यासाने सांगितले कि, “2002 मध्ये कॉम्यूटर सायन्समधून त्याने बीटेकचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रात ( BARC ) जवळपास सहा महिने प्रशिक्षणही घेतलं तिथे कामही केलं. पुढे M.Tech चं शिक्षण पूर्ण केलं. चांगल करिअर चालू असताना, चांगली नोकरी हातात असताना त्यांच मन तिथे रमलं नाही. त्यांनी त्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि संन्यासाचा वेश धारण केला.
या व्हिडिओ दरम्यान त्या संन्याश्याने एक मजेदार प्रसंगही सांगितला. संन्यासी झाल्यावर त्याला त्याच्या CEO चा फोन आला होता. तेव्हा CEO ने परत येण्यास सांगितले होते. पण जेव्हा CEO ला कळले की मी सन्यास घेतलाय तेव्हा तोही शॉकमध्ये गेला. ” तु वेडा झाला आहेस काय?” असे देखील तो बोलला होता असे त्या सन्यासाने सांगितले.
त्यांच्या संवादामुळे व्हिडिओ पाहणाऱ्यांचं लक्ष वेधल गेलं आहे. नेटकरी शॉक झाले आहेत. त्यांच्या बोलण्यावरून कमेंट्समध्ये ते कर्नाटकचे असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.मात्र या व्यक्तीचं नाव आणि त्यांच्या संपूर्ण प्रवासाची स्वतंत्र पुष्टी केलेली नाही.
View this post on Instagram
संन्यास का स्वीकारला असा प्रश्न विचारताच तो संन्यासी म्हणाला कि, जन्म आणि मृत्यू यांच्यातील काळाबद्दल आपले विचार मांडले. जन्म आणि मृत्यू यांची वेळ निश्चित असते आणि या दोन्हींच्या मध्ये मिळणारा थोडासा काळ म्हणजे आपलं आयुष्य. त्यांच्या मते आयुष्य खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे त्यांनी संन्यास स्वीकारला. असं त्यांनी सांगितलं.
नेटकऱ्यांना बसला धक्का
त्यांच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहीजण त्यांच्या निर्णयाचं कौतुक करत आहेत, तर काहीजण इंजिनिअरिंगचं शिक्षण आणि नोकरी सोडून संन्यास घेण्याइतपत एवढं काय झालं हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत
