Desi Jugaad : टाकाऊ ड्रमपासून बनवलं वॉशिंग मशीन; यूझर्स म्हणतायत, भलेभले इंजिनिअर्सही होतील नापास!

देशी जुगाड (Desi Jugaad)चे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. एक व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होतोय, जो खूपच मजेशीर आहे. व्हिडिओमध्ये एक ड्रम दिसतोय. हा केवळ ड्रम नाही, तर वॉशिंग मशीन (Washing Machine) आहे.

Desi Jugaad : टाकाऊ ड्रमपासून बनवलं वॉशिंग मशीन; यूझर्स म्हणतायत, भलेभले इंजिनिअर्सही होतील नापास!
ड्रमपासून बनवलं वॉशिंग मशीन (सौ. the.funny.us - Insta)
प्रदीप गरड

|

Jan 08, 2022 | 10:54 AM

देशी जुगाड (Desi Jugaad)चे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. ते पाहिले की आपसूकच आपण म्हणतो, व्वा, छान.. एखादं काम सोपं करण्यासाठी आपण देशी जुगाड वापरतो असं अनेकदा घडतं. देशी जुगाड म्हणजे अशा युक्ती की त्यामुळे आपली अडचण दूर होईल. आता या एपिसोडमध्ये एक व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होतोय, जो खूपच मजेशीर आहे. व्हिडिओमध्ये एक ड्रम दिसतोय. पण थांबा.. हा केवळ ड्रम नाही, तर वॉशिंग मशीन (Washing Machine) आहे. होय, त्यामुळेच सर्वांना हा व्हिडिओ खूप आवडलाय.

सोशल मीडियावर व्हायरल खरं तर एका व्यक्तीनं जुगाड करून ही मशीन तयार केलीय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि ते पाहून लोक आचंबित झालेत. ज्यानं हे जुगाड केलंय, त्याचं कौतुकही करत आहेत. तुम्हा सर्वांना माहीत असेलच, की अनेक ठिकाणी लोक हातानें कपडे धुतात. आता वॉशिंग मशीन आलं. आजच्या काळातही अनेक लोकांकडे वॉशिंग मशीन नाहीत, त्यामुळे त्यांना हातानं कपडे धुवावे लागतात.

वॉशिंग मशिननं घातलीय भुरळ कपडे धुण्यासाठी एका माणसाला अप्रतिम देशी जुगाड सापडला. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की त्या व्यक्तीनं कपडे धुण्यासाठी ड्रम वॉशिंग मशीन कसा बनवला. हा जुगाड पाहिल्यानंतर तुम्हीही एक गोष्ट म्हणाल, की या देशी जुगाडासमोर मोठमोठे इंजिनिअर्सही नापास होतील. सोशल मीडिया यूजर्सना या नवीन वॉशिंग मशिननं तर भुरळ घातलीय. यूझर्स त्यांच्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतायत.

इन्स्टावर शेअर हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलाय. तुम्ही ‘the.funny.us‘ नावाच्या अकाउंटवर सर्व व्हिडिओ पाहू शकता. हा व्हिडिओ आतापर्यंत 40 हजारांहून अधिक लोकांनी पाहिलाय. त्याचबरोबर हजारो लोकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्या प्रतिक्रियाही शेअर केल्या आहेत. एका यूजरनं लिहिलंय, की ‘हा जुगाड देशाबाहेर जाऊ नये’ याशिवाय बहुतांश यूजर्सनी तर इमोजी शेअर केलेत.

Viral : मुलांच्या वसतिगृहात हनुमान चालिसाचं पठण! काय वेगळेपण? हा हटके Video पाहाच..

माणसं ती माणसं जनावरही तसंच ! नेपाळी वाघिणीच्या प्रेमात भारतीय वाघानं रक्ताच्या बछड्याला संपवलं

Viral : नववधूच्या धमाकेदार एंट्रीनं नवरोबा आश्चर्यचकित! शेवटी तर आहे क्यूट ट्विस्ट, पाहा Video

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें