Maharashtra Bandh | नागपुरातील व्यापाऱ्यांचा महाराष्ट्र बंदला विरोध, दुकानं उघडली, बस सेवाही सुरळीत

| Updated on: Oct 11, 2021 | 9:00 AM

महाविकास आघाडीने लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. मात्र, या बंदला नागपुरातील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. नागपुरातील बाजारपेठा सुरु ठेवण्यावर व्यापारी संघटना ठाम आहेत. ‘व्यापाऱ्यांची सुरक्षा राज्य सरकारची जबाबदारी आहे, जबरदस्तीने दुकानं बंद करु नये’, अशी मागणी व्यापाऱ्यांची राज्य संघटना ‘कॅमेट’चे अध्यक्ष दिपेन अग्रवाल यांनी सरकारकडे केली आहे.

Maharashtra Bandh | नागपुरातील व्यापाऱ्यांचा महाराष्ट्र बंदला विरोध, दुकानं उघडली, बस सेवाही सुरळीत
Nagpur Shops
Follow us on

नागपूर : महाविकास आघाडीने लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. मात्र, या बंदला नागपुरातील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. नागपुरातील बाजारपेठा सुरु ठेवण्यावर व्यापारी संघटना ठाम आहेत. ‘व्यापाऱ्यांची सुरक्षा राज्य सरकारची जबाबदारी आहे, जबरदस्तीने दुकानं बंद करु नये’, अशी मागणी व्यापाऱ्यांची राज्य संघटना ‘कॅमेट’चे अध्यक्ष दिपेन अग्रवाल यांनी सरकारकडे केली आहे.

तर, उत्तर प्रदेश मधील घटनेचा आम्ही निषेध करतो. मात्र, आता काहीच दिवस झाले नियमित व्यापार सुरु झाला तो बंद करणे शक्य नाही. आता सणासुदीचे दिवस आहेत, त्यामुळे व्यापार बंद ठेवता येणार नाही. ज्यांना स्वतःहुन बंद ठेवायचा ते ठेऊ शकतात. मात्र, कोणी जबरदस्तीने व्यापार बंद करु नये. तसेच, पोलिसांनी व्यापाऱ्यांना सहकार्य करावे. अशी भूमिका नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने मांडली आहे.

नागपुरातील कॅाटनमार्केट भाजी मंडीत सर्व व्यवहार सुरळीत

नागपुरातील कॅाटनमार्केट भाजी मंडीत सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत. महाराष्ट्र बंदला प्रतिसाद न देता भाजी मार्केट सुरु आहे. शेतकऱ्यांनी आणलेल्या भाजीपाल्याची विक्री सुरळीत सुरु आहे. भाजी मार्केटमध्ये खरेदीदार आणि शेतऱ्यांची गर्दीही पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र सरकारच्या बंदला न जुमानता नागपुरात दुकानं उघडायला सुरुवात –

महाराष्ट्र सरकारच्या बंदला न जुमानता नागपुरात दुकानं उघडायला सुरुवात झाली आहे. किराणा दुकानं, वाईन शॅापसह इतर दुकानं उघडायला सुरुवात झाली आहे. नागपूरच्या बसस्थानकावरही बसेस सुरुळीत सुरु आहेत. राज्यभरात विविध जिल्ह्यात जाणाऱ्या बसेस सुरु आहेत. बसस्टॅापवरही प्रवाशांचीही गर्दी पहायला मिळत आहे. महाराष्ट्र बंदला प्रतिसाद न देता बस सेवा सुरळीत सुरु आहेत.

पुण्यात व्यापारी महासंघाचा दुकानं बंद ठेवून बंदला पाठिंबा –

तर पुण्यात आज व्यापारी महासंघानं दुकानं बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला आहे. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, मंडई, शिवाजी रोडवरची दूकानं कडकडीत बंद ठेवण्यात आली आहेत. दुपारी 3 वाजेपर्यंत दूकानं बंद राहणार आहेत. लक्ष्मी रस्त्यावर एकही दुकानं उघडलं गेलं नाहीये.

महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचा बंदला पाठिंबा

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 9 ऑक्टोबरला तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत बंदला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच हा बंद सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा. सोमवारी व्यापाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवाव्यात असे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Bandh | पुण्यातील पीएमपीएल सेवा दुपारी 12 पर्यंत बंद, व्यापारी महासंघाचाही बंदला पाठिंबा

Maharashtra Bandh | पुण्यानंतर मुंबईतही महाराष्ट्र बंदला काही व्यापारी संघटनांचा विरोध, शेतकऱ्यांना मात्र पाठिंबा