आखाडा नागपूर महानगरपालिका निवडणुकीचा, एक प्रभाग पद्धतीचा कुणाला फायदा कुणाला तोटा?

| Updated on: Aug 26, 2021 | 6:36 PM

निवडणूक एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीने होणार असल्याने सलग 15 वर्षांपासून नागपूर महापालिकेत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला यावेळी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे.

आखाडा नागपूर महानगरपालिका निवडणुकीचा, एक प्रभाग पद्धतीचा कुणाला फायदा कुणाला तोटा?
BJP Congress Logo
Follow us on

नागपूर: महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग पद्धती बाद झाल्याने, आता नागपूर मनपाच्या निवडणुकीतील चुरस वाढणार आहे. निवडणूक एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीने होणार असल्याने सलग 15 वर्षांपासून नागपूर महापालिकेत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला यावेळी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. तर, दुसरीकडे प्रभाग पद्धतीत तग धरू न शकणाऱ्या काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या या नव्या पद्धतीने आशा पल्लवीत झाल्यात. नव्या प्रभाग पद्धतीत भाजप बाजी मारणाक की काँग्रेससह विरोधी पक्ष बाजी पलटवणार हे पाहावं लागणार आहे.

भाजप 15 वर्षे सत्तेत

नागपूर महानगरपालिकेत गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. गेल्यावेळे एका प्रभात चार सदस्य अशा पद्धतीनं निवडणूक झाली आणि त्यावेळेस 151 पैकी भाजपचे 108 नगरसेवक निवडणूक आले होते. पण यावेळेस एक सदस्यीय प्रभाग आहे. त्यामुळे आता भाजपचा कस लागणार आहे. नागपुरात आता सदस्य संख्या न वाढल्यास 38 प्रभागाचे 151 वॉर्डात विभाजन होईल. एक प्रभाग झालाय त्यामुळे ही निवडणूक आणखी सोपी जाईल, असा विश्वास भाजपचे धर्मपाल मेश्राम आणि प्रविण दटके यांनी व्यक्त केलाय.

नागपूर महानगरपालिकेतील सघ्याचं पक्षीय बलाबल पाहूया…

एकूण सदस्य: 151

भाजप :108

काँग्रेस: 29

बसपा : 10

इतर :04

मागली निवडणुकीत भाजपला संघटनं मजूबत असल्याचा फायदा

2017 मधील नागपूर महानगरपालिका निवडणूक चार प्रभाग पद्धतीत झाली, चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत एका प्रभागाचा आकार जवळजवळ विधानसभा मतदारसंघाइतका होता. संघटन मजबूत असल्याने याचा फायदा भाजपला झाला होता. आणि काँग्रेसला मोठा फटका बसला होता. आता एक सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे काँग्रेसच्या आशाही पल्लवीत झाल्यात, असं विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी म्हटलं आहे.

नागपूर महापालिकेत सध्या 151 सदस्य आहेत. हुडकेश्वर नरसाळा, रनाळासह इतर काही शहराला लागून असलेला पण ग्रामीणमध्ये समाविष्ट असलेला भाग महापालिका हद्दीत जोडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदस्य संख्या वाढून वॅार्डाची हद्दीही बदलण्याची शक्यता आहे.

भाजप खासदार गिरीश बापट यांचा विरोध

भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध असल्याचं सांगितलं. आम्हाला चार सदस्यीय प्रभाग पद्धती हवी आहे. त्यामुळे एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला आमचा विरोध आहे. हा सगळा राज्य सरकारचा निर्णय आहे, कॅबिनेट काय निर्णय घेते ते बघू, असं बापट यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इतर बातम्या:

पुणे, पिंपरी चिंचवडसाठी आता ‘एक प्रभाग एक नगरसेवक पद्धत’, महापालिकेत राजकीय समीकरणं बदलणार?

जातीनिहाय जनगणनेसाठी बिहारमधील सत्ताधारी एकवटले; रोहित पवार म्हणाले..

भाजप आमदार राहुल कुल यांना धक्का, साखर कारखान्याला जप्तीची नोटीस

Nagpur Municipal Corporation Election BJP or Congress claim advantage State Election Commission declare Local body election will  done ward one candidate method