Nagpur division : निपुण भारत अभियान, नागपूर विभागातील आदिवासी विभागाच्या 75 शाळा, भविष्यवेधी शिक्षण प्रणाली काय?

| Updated on: Jul 29, 2022 | 9:43 PM

आदिवासी विकास विभागात भविष्यवेधी शिक्षण प्रणाली अंतर्गत नवचेतना हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन स्वत:पासून सुरुवात करुन विद्यार्थ्यांना शिकण्याच्या नवनवीन पध्दती आत्मसात करण्यासाठी प्रेरीत करावे, असे आवाहनही श्री. घुले यांनी यावेळी केले.

Nagpur division : निपुण भारत अभियान, नागपूर विभागातील आदिवासी विभागाच्या 75 शाळा, भविष्यवेधी शिक्षण प्रणाली काय?
नागपूर विभागातील आदिवासी विभागाच्या 75 शाळा
Follow us on

नागपूर : विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याचे कौशल्य विकसित होण्यासाठी निपुण भारत अभियानांतर्गत (Nipun Bharat Abhiyaan) भविष्यवेधी शिक्षण प्रणाली महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांमध्ये गणितीय, भाषिक, आंतरवैयक्तिक तसेच निसर्गवादी बुद्धिमत्ता आदींमध्ये परिणामकारक बदल झाले आहे. विभागातील आदिवासी विकास विभागाच्या 75 शाळांमध्ये भविष्यवेधी शिक्षण प्रणाली सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे (Ravindra Thackeray,) यांनी आज येथे दिली. शिक्षकांनी अध्यापन पध्दतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा काळानुरुप वापर करावा. गृप लर्निंग, विषय मित्र, मोहल्ला वर्ग तसेच पिअर लर्निंगचा उपयोग करावा. विभागाच्या नवचेतना उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन (Agricultural Extension Management) प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे भविष्यवेधी शिक्षण विचार या विषयासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत ते  बोलत होते. मनरेगा योजनेचे मास्टर ट्रेनर तथा शिक्षण तज्ज्ञ निलेश घुगे यावेळी उपस्थित होते.

नागपूर विभागात 75 शासकीय आश्रमशाळा

केंद्र सरकारच्या निपूण भारत अभियान अंतर्गत राज्य शासनाव्दारे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने पायाभूत साक्षरतेचे विविध शैक्षणिक घटक अंतर्भूत करण्यात आले आहेत. आदिवासी विकास विभागाव्दारे नवचेतना उपक्रम विभागाच्या सर्व शाळामध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नागपूर आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या नऊ प्रकल्पांतील 75 शासकीय आश्रमशाळांतील 20 हजार 361 व 138 अनुदानित आश्रमशाळांतील 45 हजार 129 विद्यार्थी शिकतात. भविष्यवेधी शिक्षण प्रणाली अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाचे परिपूर्ण शिक्षण देण्यात येत आहे. यासाठी संबंधित शाळेच्या सर्व शिक्षकांना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. येत्या काही महिन्यात या प्रणालीच्या अंमलबजावणीचे यश दिसून येईल, असेही रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

सहा सी विकसित करणे आवश्यक

निलेश घुले म्हणाले की, भविष्यवेधी शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये क्रिटीकल थिकींग, क्रिएटिव्ह थिकींग, कोलॅबोरेशन, कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स, कंम्पॅसन हे सहा सी विकसित करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षकांनी पुढीलप्रमाणे सहा पायऱ्यांचा उपयोग करावा. मुलांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग, सेल्फी विथ सक्सेस अशा सहा पायऱ्यांचा वापर करुन मुलांच्या शिकण्याच्या गतीमध्ये वाढ होईल. यासोबतच टेक्झॉनॉमी ब्लुमजी, हावर्ड गार्डनरच्या नऊ बुध्दिमत्ता, सहा सी शिदोरी वेध आदी बाबींचा समावेश करावा. समर्पक शिक्षण प्रक्रिया विकसित करावी. आदिवासी विकास विभागात भविष्यवेधी शिक्षण प्रणाली अंतर्गत नवचेतना हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन स्वत:पासून सुरुवात करुन विद्यार्थ्यांना शिकण्याच्या नवनवीन पध्दती आत्मसात करण्यासाठी प्रेरीत करावे, असे आवाहनही श्री. घुले यांनी यावेळी केले.

हे सुद्धा वाचा