Nagpur swine flu : नागपूर शहरात स्वाईन फ्लूचे 32 रुग्ण, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन, मनपा दवाखान्यात मोफत चाचणी

स्वाईन फ्लू, मंकिपॉक्स आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नागपूर महापालिकेव्दारे विशेष हेल्पलाईन क्रमांक 9175414355 जारी करण्यात आला आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध राहील, असेही मनपाच्या साथरोग विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी सांगितले.

Nagpur swine flu : नागपूर शहरात स्वाईन फ्लूचे 32 रुग्ण, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन, मनपा दवाखान्यात मोफत चाचणी
स्वाईन फ्लू
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 8:45 PM

नागपूर : कोव्हिड रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच नागपूर शहरात इन्फल्युएंझा A (H1N1) किंवा स्वाईन फ्लू या आजाराचे या वर्षात एकूण 32 रुग्ण आढळले. यापैकी 27 रुग्ण नागपूर महानगरपालिका हद्धीतील आहेत. 13 रुग्ण शहराबाहेरील आहेत. मागील काही दिवसापासून यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. महापालिका साथरोग विभागाकडून (Department of Epidemiology) प्राप्त माहितीनुसार शहरातील वेगवेगळया भागात निवासी असलेले एकूण 32 रुग्णांचा सकारात्मक अहवाल प्रयोगशाळा तपासणीत (Laboratory Report) आढळला. स्वाईन फ्लू हा तसा सौम्य आजार असला तरी जोखमीचे गटातील जसे ज्येष्ठ नागरिक, गर्भवती स्त्रिया, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा प्रतिकारशक्ती क्षीण असणा-या व्यक्तीमध्ये हा आजार गंभीर स्वरुप धारण करु शकतो. त्यामुळे जीवाला धोका सुध्दा होऊ शकतो. करिता नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन साथरोग विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे (Govardhan Navkhare) यांनी केले आहे.

स्वाईन फ्लूची लक्षणं काय?

स्वाईन फ्लूवर खात्रिशीर औषधोपचार उपलब्ध आहेत. लवकर व वेळीच निदान झाल्यास वेळेवर औषध सुरु करता येते. सर्दी-पडसे, घसा दुखणे, अंगदुखी यासारखे फ्लू सदृष्य लक्षणे असल्यास कोव्हिडसोबत स्वाईन फ्लू तपासणी करणे आवश्यक आहे. नागपूर महापालिकेची रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ही तपासणी मोफत केली जात आहे. सध्यास्थितीत शहरात 32 रुग्णाबाबत माहिती मिळाली आहे.

मनपातर्फे विशेष हेल्पलाईन

स्वाईन फ्लू, मंकिपॉक्स आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नागपूर महापालिकेव्दारे विशेष हेल्पलाईन क्रमांक 9175414355 जारी करण्यात आला आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध राहील, असेही मनपाच्या साथरोग विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

स्वाईन फ्लू टाळण्याकरिता हे करा

हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत. गर्दीमध्ये जाणे टाळा. स्वाईन फ्लू रुग्णापासून किमान ६ फूट दूर रहा. खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावा. भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी. पौष्टीक आहार घ्यावा.

हे करु नका

हस्तांदोलन अथवा आलिंगन, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.