Nagpur Medical | मेडिकलमधील अद्ययावत कँसर हॉस्पिटलचे काय होणार?, बांधकामाचे 33 कोटी परत जाण्याच्या मार्गावर

| Updated on: Jan 29, 2022 | 6:35 AM

नागपूरच्या मेडिकलमध्ये कँसरवर अद्ययावत उपचार व्हावे, यासाठी निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली. निधी हाफकीन महांडळाकडे खर्च करण्यासाठी आला. पण, तो खर्च झाला नसल्यानं रुग्णांच्या उपचारावर त्याचा परिणाम होणार आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Nagpur Medical | मेडिकलमधील अद्ययावत कँसर हॉस्पिटलचे काय होणार?, बांधकामाचे 33 कोटी परत जाण्याच्या मार्गावर
नागपुरातील मेडिकल रुग्णालय
Follow us on

नागपूर : नागपूर शहर हे देशाचे मध्यवर्ती केंद्र आहे. विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील रुग्ण नागपुरातील मेडिकलमध्ये रेफर केले जातात. मेडिकलमधील कँसर रुग्णालय अद्ययावत व्हावे, यासाठी ज्येष्ठ कँसरतज्ज्ञ डॉ. कृष्णा कांबळे (Senior oncologist Dr. Krishna Kamble) यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे मेडिकलमधील कँसर हॉस्पिटलला (Cancer Hospital in Medical) मंजुरी मिळाली. न्यायालयानेही याची दखल घेतली. मेडिकलमध्ये कँसर हॉस्पिटल उभारण्याचे निर्देश दिले. 2018 मध्ये यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून वीस कोटी रुपये, तर आदिवासी विभागाकडून तीन कोटी रुपये मेडिकलला मिळाले. शासकीय रुग्णालयांत यंत्रसामग्री खरेदी करण्याची जबाबदारी हाफकीनकडे आहे. त्यामुळं हाफकीन महामंडळांकडे (Halfkin corporations) हा निधी वळता करण्यात आला. या निधीतून यंत्रसामग्री तसेच बांधकाम करायचे होते. परंतु, हाफकीननं बांधकाम नसल्याचे कारण देऊन निधी परत केला.

मंजुरी मिळाली, खर्च केव्हा होणार

2019 मध्ये कँसर हॉस्पिटलला प्रशासकीय मंजुरी मिळाली. हॉस्पिटलच्या बांधकामासाठी 75 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. याला तीन वर्षे झाली. हाफकीन महांडळाने हा निधी 22 डिसेंबर रोजी मेडिकलकडे परत पाठविला. मेडिकलने हा निधी सामाजिक न्याय व आदिवासी विभागात जमा करण्यासाठी 28 डिसेंबरला पत्र पाठविले. त्यामुळं आता हा निधी खर्चाविना परत जाण्याची शक्यता आहे.

कोबाल्ट युनिट कालबाह्य

मेडिकलच्या कँसर विभागात 2006 मध्ये कोबाल्ट युनिट स्थापन झाले होते. हे युनिट आता कालबाह्य झाले आहे. रेडिएशनमुळं कँसरच्या रुग्णांवर साईड इफेक्ट होतात. लिनीअर एक्सीलरेटसारख्या अद्ययावत यंत्रामुळं कँसरच्या पेशींना लक्ष्य केलं जाते. यासाठी अद्ययावत यंत्रांची गरज आहे. निधी योग्य पद्धतीनं खर्च न झाल्यास त्याचा फटका मेडिकलमधील कँसरच्या रुग्णांना बसतो. काही कँसर रुग्ण नागपुरात सुविधा नसल्याचं सांगून मुंबई गाठतात. त्यापेक्षा येथेच सुविधा निर्माण केल्यास मुंबईसारख्या दूर असलेल्या ठिकाणी रुग्णांना जावे लागणार नाही.

Nagpur Butterfly Video : विदर्भातलं बोलणारं फुलपाखरू पाहिलंय? अॅपच्या माध्यमातून साधतंय संवाद

Nagpur NMC | नगरसेविकेच्या पतीने सोडली कचरागाडीची हवा!; नागपुरात नेमकं काय घडलं?

रोजगार मागणाऱ्या तरुणांच्या हाती वाईनची बाटली का?; व्यापारी संघाचे ज्ञानेश्वर रक्षक यांचा सवाल