डॉक्टर रुग्णालयात गेले. घरी कुणीच नव्हते. ही संधी चोरट्यांनी साधली. डॉक्टरचं घर फोडलं. आतमध्ये प्रवेश करून दागिने ताब्यात घेतले. सुमारे आठ लाख रुपये किमतीचे ते दागिने होते. हे सारे घेऊन चोर पसार होत होते. तेवढ्यात डॉक्टर रुग्णालयातून घरी आले. पाहतात तर चोर पळून जाण्याच्या बेतात होता.
सुमन विहार निवासी डॉ. कोमल सिंह ठाकूर हे चौधरी रुग्णालयात कार्यरत होते. दारुच्या आधीन गेल्याचे त्यांच्याबाबत सांगण्यात येते. या दारुच्या कारणावरूनच त्यांच्या घरात कौटुंबिक कलह होत होता. हाच कलह मागील काही दिवसांपासून सुरू होता. परिणामी ठाकूर यांची शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास पत्नीसोबत वाद झाला
जप्त करण्यात आलेला गांजा, ड्रग्स यांचा साठा जास्त दिवस करता येत नाही. त्यामुळे त्याला नष्ट करावे लागते. यासाठी पोलिसांची एक कमिटी असते. त्या कमिटीत अनेक वरिष्ठ दर्जाचे अधिकारी असतात. यांच्या मार्गदर्शनात हा माल नष्ट करण्यात येतो.
आगीच्या घटनेची माहिती होताच अग्निशमन दल व वनविभागाच्या चमूनं याची दखल घेतली. दुपारची वेळ असल्यानं ही आग पसरत होती. पण, अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कर्मचारी नेटानं कामाला लागले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं ही आग नियंत्रणात आणली.
राज्य सरकारला सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे. तोपर्यंत हा डेटा तयार करावा. राज्य सरकारला निवडणुका या ओबीसी आरक्षणशिवाय घ्यायच्या आहेत. त्यामुळे आयोग वेळ काढूपणा करत आहे. आयोगावर सरकारचं प्रेशर आहे, असंही ते म्हणाले.
ती मुलगी बऱ्याच ठिकाणी फिरली. त्यामुळं तिच्यावर अत्याचार कुणी केला, हे सांगता येणार नाही. पण, रेल्वेस्टेशन परिसरातील ऑटोवाला व्यक्ती असल्याची माहिती मतिमंद मुलीनं आपल्या आईला दिली. त्यावरून तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
11 जुलै 2017 रोजी सव्वा किलो गांजा तस्करी करताना निलेश आसरेला अटक करण्यात आली होती. अमली पदार्थ विरोधी पथकानं सहा तास विलंबानं गुन्हा दाखल केला. पण, विलंबाचे कारण त्यांनी स्पष्ट केले नाही. त्यामुळं पोलिसांनी आरोपीला खोट्या गुन्ह्यात तर अडकवलं नाही, अशी शंका न्यायालयानं उपस्थित केली.
सुमारे चाळीस वर्षे इसमाचा मृतदेह कोरड्या नाल्यात पडलेला दिसला. हा मृतदेह अर्धनग्रन अवस्थेत होता. मृतदेहाच्या गुप्तांगाला दोरी बांधलेली दिसली. त्यामुळं अनैतिक संबंधातून हा खून झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
मेडिकल चौकात विद्यार्थिनी शिकवणीला जात होती. पायऱ्या चढत असताना एक मनोरुग्ण तिथं आला. त्यानं तिच्या डोक्यावर हातोडा मारला. ती जोरानं ओरडली. आजूबाजूचे तिच्या मदतीला धावले. मनोरुग्णाला बाजूला केलं. पोलिसांनी मनोरुग्णाच्या पालकांना बोलावून त्याला त्यांच्या स्वाधीन केलं.
हा चोर डुप्लिकेट चाबी बनवायचा. त्या चाबीचा वापर करून बाईक चोरी करायचा. बाईक चोरी केल्यानंतर तिला गहाण ठेवायचा. त्यासाठी तो वडिलांना कँसर झाल्याचं सांगायचा. दयामाया ठेवून त्याची चोरलेली बाईक लोकं गहाण ठेवत. पण, त्या पैशातून तो चैन करायचा. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.