पुन्हा तू तू मैं मैं? संजय राऊतांबद्दल नाना पटोले यांची पुन्हा प्रतिक्रिया; म्हणाले, त्यांना माझा प्रेमाचा सल्ला…

भाजपच्या नेत्याने बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबाबत आक्षेपार्ह विधान केलं. महिलांचा अपमान करणं हा भाजपचा स्वभाव आहे. त्यामुळे भाजपकडून दुसरी कशाचीच अपेक्षा नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

पुन्हा तू तू मैं मैं? संजय राऊतांबद्दल नाना पटोले यांची पुन्हा प्रतिक्रिया; म्हणाले, त्यांना माझा प्रेमाचा सल्ला...
nana patole Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 28, 2024 | 11:21 AM

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात पुन्हा एकदा जुंपली असल्याचं पाहायला मिळत आहे. विदर्भात 32 जागांपैकी ठाकरे गटाला फक्त एकच जागा सोडण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर नाना पटोले यांनी राऊत यांना चांगलंच फटकारलं आहे. त्यांची नाराजी असणं हे त्यांचं व्यक्तीगत मत आहे. आम्हालाही कोकणात एकही जागा मिळाली नाही. मग आम्ही काय करायचं? कुणाला किती जागा मिळाल्या हा विषय नाही. संजय राऊत यांनी हे विषय क्लोज केले पाहिजे. आपल्याला विरोधकांविरोधात लढायचं आहे. राऊत यांनी त्यांची तोफ विरोधकांवर डागली पाहिजे हा माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी राऊत यांना सुनावले.

नाना पटोले हे मीडियाशी संवाद साधत होते. शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप चालत असते. अजूनही एक दोन जागेबाबत चर्चा सुरू आहे. हायकमांडने लक्ष घातले आहे. मित्र पक्षांशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे लवकरच जागा वाटपाचा प्रश्न निकाली निघेल. कोण किती जागावर लढणार? काय फॉर्म्युला आहे? याचे आकडे कुठून येतात माहीत नाही. आकडे ठरलेले नसतानाही माध्यमांमध्ये ते दाखवले जात आहेत, असं नाना पटोले म्हणाले.

हायकमांडच्या पातळीवर निर्णय

सोलापूरमध्ये काँग्रेसने जशी टायपिंग मिस्टेक केली, तशी आम्हीही करू शकतो, असं संजय राऊत म्हणाले होते. त्याचाही त्यांनी समाचार घेतला. याबाबत आमच्या हायकमांडने निर्णय घेतला आहे. त्यांच्या पातळीवर सोलापूरबाबत चर्चा होईल. असं वाटतं. राज्य म्हणून आम्ही त्यात प्रतिक्रिया देणार नाही, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

भाजपकडे कपडे फाडतात

कोल्हापूरसारखं थोडे दिवस होतं. भाजपकडे तर एकमेकांचे कपडे फाडले जात आहेत. ज्यांना तिकीट मिळालं नाही ते नाराज होतो. ज्याला मिळालं तो आनंदात असतो. हा निवडणूक प्रक्रियेचा भाग असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तर महाराष्ट्रावर कंट्रोल राहणार नाही

महाराष्ट्र समजा महायुतीच्या हाती गेला तर राज्यावर दुसऱ्यांचं कंट्रोल राहील. आपल्या महाराष्ट्रावर आपलं नियंत्रण नसेल, असं सांगतानाच प्रादेशिक पक्षांना सांभाळणं हे राष्ट्रीय पक्षांचं काम आहे. सर्व आघाड्या सांभाळणं हे राष्ट्रीय पक्षांचं काम आहे. आघाडी ही अत्यंत महत्त्वाची असते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....