AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: अजितदादांच्या अपघातातील ब्लॅकबॉक्स सुरक्षित असताना जळाल्याचं का सांगितलं? रोहित पवारांचा रोकडा सवाल

Rohit Pawar on Black Box: दिवंगत अजितदादांच्या विमान अपघाताविषयी शंकाकुशंकांचे मोहोळ उठले आहे. आमदार रोहित पवार यांनी हा मुद्दा लावून धरला आहे. आता रोहित पवार यांनी याप्रकरणी पुन्हा एक रोकडा सवाल तपास यंत्रणा आणि केंद्र सरकारला विचारला आहे.

Rohit Pawar: अजितदादांच्या अपघातातील ब्लॅकबॉक्स सुरक्षित असताना जळाल्याचं का सांगितलं? रोहित पवारांचा रोकडा सवाल
रोहित पवार, अजित पवार, एएआयबीImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 17, 2026 | 10:58 AM
Share

Rohit Pawar on Black Box: दिवंगत अजितदादांच्या विमानाचा अपघात झाल्याचा सशंय आमदार रोहित पवार सातत्याने करत आहेत. त्यांनी याप्रकरणी चार पत्रकार परिषद घेत सादरीकरण केले आहेत. त्यात VSR कंपनी, या कंपनीचा मालक व्ही. के. सिंग आणि AAIB आणि इतर तपास यंत्रणांच्या संथ तपासावर त्यांनी सडकून टीका केली. ॲरो नावाच्या ग्रुपमध्ये सिव्हिल एव्हिएशन गव्हर्मेंट आणि सरकारी अधिकारी आहेत. त् ॲरो नावाच्या ग्रुपमधील सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. एफआयआरमध्ये ॲरोमधील अधिकाऱ्यांचे नाव आलं पाहिजे, अशी मोठी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. तर आतापर्यंत ब्लॅक बॉक्स जळाल्याचा दावा करण्यात येत होता. तर आता हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर अजितदादांच्या अपघातातील ब्लॅकबॉक्स सुरक्षित असताना जळाल्याचं का सांगितलं? असा रोकडा सवाल रोहित पवार यांनी विचारला.

रोहित पवार यांची पोस्ट काय?

“अजितदादांच्या विमान अपघाताच्या संवेदनशील विषयावर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांनी दिलेलं थातुरमातूर आणि वेळ मारून नेणारं उत्तर संपूर्ण देशाने बघितलं. पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय निकषानुसार तपास सुरु असल्याचं सांगणाऱ्या मंत्र्यांनी बारामती दुर्घटनेतील ब्लॅकबॉक्स सुरक्षित असतानाही black box जळाल्याचं का सांगितलं? आणि अमेरिकन एजन्सी अहमदाबाद अपघाताबद्दल माहिती मागत असतानाही माहिती का दिली जात नाही? याची उत्तरं द्यावीत.

VSR कंपनी सोबत आर्थिक संबंध असणाऱ्या VSR च्या मालकाच्या मुलाच्या लग्नात पाहुणचार करून आलेल्या आणि मिठाला जागणाऱ्या केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्याकडून अपेक्षा तरी कशी करणार? मात्र काँग्रेससह INDIA आघाडीतील मित्रपक्ष हा विषय प्रभावीपणे मांडतीलच, असा विश्वास आहे!” अशी पोस्ट रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली आहे .

अजितदादांच्या विमान अपघाताविषयी राज्यसभेत मोठी मागणी

राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी राज्यसभेत अजितदादांच्या विमान अपघाताविषयी प्रश्न विचारले. त्यावर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी उत्तर दिलं. एअर एव्हिएशन इनव्हेस्टीगेशन ब्यूरोकडून तपास सुरू आहे. AAIB दादांच्या विमान अपघाताप्रकरणी सखोल आणि पारदर्शक तपास करत आहे, असे नायडू यांनी सांगितले. तर तपास कसा व्हावा हे भारत सरकार ठरवत नाही. तर आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल ठरवते आणि त्यानुसारच पुढील तपास सुरू आहे . जगात कुठेही अपघात झाला तरी याच प्रकारे तपास होतो. यापूर्वी ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला जायचा. पण आता ब्लॅक बॉक्स इथेच एएआयबी लॅबमध्ये डीकोड होत असल्याचा दावा त्यांनी केला. तर देशातच तपास होण्यासाठीची व्यवस्था तयार होत असल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री म्हणाले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी