AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan: पाकिस्तानची वाट लागणार, हुती बंडखोर हल्ला करणार? थेट धमकीने उडाली घाबरगुंडी

Yemen Houthis warns Pakistan:आता आखातामधील युद्धाची झळ भारताच्या शेजारील पाकिस्तानला बसण्याची शक्यता आहे. शिया बंडखोर हुतींनी पाकिस्तानवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. यामुळे इस्लामाबादमध्ये हालचाली वाढल्या आहेत.

Pakistan: पाकिस्तानची वाट लागणार, हुती बंडखोर हल्ला करणार? थेट धमकीने उडाली घाबरगुंडी
यमन हुती, पाकिस्तान, तुर्की, सौदी अरबImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 20, 2026 | 8:55 AM
Share

यमनमधील इराणसमर्थित हुती बंडखोरांनी पाकिस्तानला आगळीक न करण्याचा सल्ला दिला आहे. मक्का करारातंर्गत पाकिस्तान आणि तुर्कीने यमनविरोधात कारवाई केली. तर या दोन्ही देशांवर हल्ला करण्याची धमकी हुतींनी दिली आहे. यमनमध्ये लष्करी हस्तक्षेप केल्यास सौदीसारखेच गंभीर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील अशी धमकीच हुतींच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे इस्लामाबादमध्ये हालचाली वाढल्या आहेत. हुतींची कारवाईची पद्धत पाहता लष्करी अधिकाऱ्यांची घाबरगुंडी उडाली आहे. काल काही आंतरराष्ट्रीय माध्यमांशी बोलताना लष्कर आणि सरकारशी संबंधित अधिकाऱ्यांनी सौदी अरबसाठी लष्करी मदत देण्याचे जाहीर केल्यानंतर हुतीने पाकिस्तानला हा इशारा दिला आहे.

मक्का करार, हुतींचे टेन्शन

सौदी, अरब, पाकिस्तान आणि तुर्की या तीन देशात नुकतेच मक्का ज्वाईंट डिफेन्स अग्रिमेंट झाले. नाटोच्या (NATO) धरतीवर हा प्रयोग करण्यात आला. करारानुसार, तीन देशांपैकी एकावरील हल्ला हा इतर देशांवरील हल्ला मानला जाणार आहे. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर ताज्या घडामोडीत हुतींनी गेल्या आठवड्यापासून सौदी अरबवर जोरदार हल्ले चढवले आहेत. मक्केवरही ड्रोन डागण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप सौदीने केला आहे. तर हुती बंडखोरांनी सौदीचे ऊर्जा प्रकल्प, तेल विहिरी आणि मोखा बंदरावर तीव्र हल्ले चढवल्याचा दावा केला आहे. करारानुसार, सौदीच्या मदतीसाठी सैन्य पाठवणे पाकिस्तानाला बंधनकारक आहे. पण आठवडा उलटूनही पाकिस्तानच्या लष्कराने सौदीकडे कूच केलेली नाही.

भूत गळ्यात कोण बांधून घेईल असा प्रश्न पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठांना पडला आहे. सौदीच्या मदतीला सैन्य पाठवल्यास हुती बंडखोर इराणच्या सीमेवरून पाकिस्तानवर हल्ला करण्याची दाट शक्यता आहे. हुतीचे वरिष्ठ अधिकारी मोहम्मद अल बुखैती यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तान आणि तुर्कीचा हा करार केवळ कागदावरच मर्यादित आहे. जर या देशांनी सौदीच्या बाजूने यमनमध्ये लष्करी हस्तक्षेप केला तर मग त्याची किंमत दोन्ही देशांना मोजावी लागेल.

अगोदरच कंगाल, त्यात युद्धाचा भार

अगोदरच भीकेला लागलेल्या पाकिस्तानला नवीन युद्ध झेपावणे अवघडच नाही अशक्य आहे. सौदी अरबकडून आर्थिक मदत आणि तेल पुरवठा मिळाल्याने शेजारील देशाला दिलासा मिळाला आहे. बलुचिस्तानमधील बंडामुळे अगोदरच हा देश त्रस्त आहेत. त्याच बाजूने जर हुतींनी इराणमधून हल्ले चढवले तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडेल. पण दुसरीकडे सैन्य मदत न पाठवल्यास सौदी अरब नाराज होऊन आखडता हात घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानची दमकोंडी झाली आहे. मदत पाठवली तरी संकट आणि नाही पाठवली तर रसद तुटणार अशी अवस्था पाकिस्तानची झाली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी