Gokul President Election : त्यावेळी आम्ही देखील या गोष्टी लक्षात ठेऊ, गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खोडा घालणाऱ्या सतेज पाटलांची वॉर्निंग
Gokul President Election : "सिंपल मेजोरिटी ही मेजोरिटी असते. वाजपेयींचं सरकार एकामताने पडलेलं, त्या एकामताला पण किंमत आहे ना. 10 तारखेला होणाऱ्या गोकुळच्या बैठकीला सर्व 25 संचालक उपस्थित राहतील. हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये तसं आहे" असं सतेज पाटील म्हणाले.

“लोकांनी जो कौल दिलाय तो बाजूला ठेऊन त्या ठिकाणी तसं करणं संयुक्तीक ठरणार नाही, तसं गुजरात, पुणे महापालिकेत झालं होतं. मग, निवडणुकीला अर्थ राहणार नाही. असा निर्णय होऊ नये अशी अपेक्षा आहे” असं काँग्रेस नेते सतेज पाटील म्हणाले. गोकुळ अध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. गोकुळमध्ये लेटर वॉर सुरु आहे. पत्राला प्रत्युत्तर दिलय. गोकुळसाठी नाही स्वत:साठी चाललय. त्यावर सतेज पाटील म्हणाले की, “हे सर्व कोल्हापूरला माहित आहे, माझ्या स्वत:साठी असतं तर माझा पोरगा निवडणुकीला उभा राहिला असता. आमच्या समर्थकांकडून कुठलीही चिथावणीखोर भाषा झालेली नाही. सहा महिने जे चिथावणीखोर भाषा करत होते, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात निवडणुकीत. आम्ही कधीच कोणावर टीका केली नाही. माझा निवडणुकीत अजेंडा फिक्स होत. साडेपाच लाख शेतकऱ्यांना न्याय देणं हा माझा अजेंडा होता. मी टीका करत नव्हतो, त्यामुळे माझ्याकडून चिथावणीखोर होण्याचा प्रश्नच नाही” असं सतेज पाटील बोलले.
कोरमचा मुद्दा पुढे केलाय, तुम्हाला एक कमी पडतोय, आमचे दोन कमी पडतायत तुम्ही तुमचे दोन द्या असं महायुतीचं म्हणणं आहे. “हे विधानच हास्यास्पद आहे. निवडणूक आलेल्यातला मी एक तिकडे द्यायचा आणि तुमचा चेअरमन करायचा. मग आम्हाला बहुमत का दिलं? जसं ते म्हणतात आम्हाला विरोधी पक्षात रहाण्याचा कौल मिळालाय, आम्ही ती भूमिका निभावू. मग निभावा.आमची काय अडचण नाही. शिंदे गटाचे सहा नगरसेवक मुश्रीफ साहेबांनी इथे द्यावे मी आमचा महापौर करतो. आमचेही 35 नगरसेवक तिथे आहेत” असं सतेज पाटील म्हणाले. “तो पत्राचा विषय काहीही बोलायचं असा आहे. या सगळ्या गोष्टीचं समर्थन करु शकत नाही, म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून ते पत्र काढलेलं आहे. त्या पत्रावर सह्या कोणी करायच्या यावरुन वाद झाला” असा दावा सतेज पाटील यांनी केला.
गोकुळमध्ये साडेपाच लाख शेतकऱ्यांची सत्ता
“गोकुळमध्ये साडेपाच लाख शेतकऱ्यांची सत्ता आहे. सतेज पाटलांची सत्ता नाही. निवडणूक झाली मी म्हणजे 5500 ठरावधारक आणि 25 संचालक मिळून कारभार करतील. महायुतीचे संचालक अलिबागला जाणार की जयपूरला मला कल्पना नाही. इथून बाहेर पडले हा त्यांच्या रणनितीचा भाग असू शकतो. 13 लोक आमचे निवडून आले. लोकांनी स्पष्टपणे कौल आमच्याबाजूने दिलाय. कोरमचा मुद्दा तांत्रिक आहे. कॅबिनेटमध्ये आज काय ठरतं, त्यावर मी उद्या बोलेन” असं सतेज पाटील म्हणाले.
2029 मध्ये देखील सत्ता बदलणार आहे
“लोकशाहीचा कौल बाजूला ठेवणार मग कोण गप्प बसणार?. 2029 मध्ये देखील सत्ता बदलणार आहे, त्यावेळी आम्ही देखील या गोष्टी लक्षात ठेऊ. मी म्हटलेलं निवडून आल्यावर गोकुळमध्ये एकत्र कारभार करु” असं सतेज पाटील म्हणाले.
