AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 20: “नंगा कर देती…”, अश्लील कमेंटमुळे बिग बॉसच्या मोठा वाद! माहीचा मोठा निर्णय, करोडोंची ऑफर धुडकावणार?

Bigg Boss 20: "नंगा कर देती...", 'बिग बॉस 20' च्या घरात आता मोठा वाद सुरु झाला आहे. माही वीज आणि लव्ह गिलच्या वादाने आता सर्वत्र खळबळ माजली आहे. झालेल्या वादानंतर माही धुडकावणार करोडोंची ऑफर ?

Bigg Boss 20: नंगा कर देती..., अश्लील कमेंटमुळे बिग बॉसच्या मोठा वाद! माहीचा मोठा निर्णय, करोडोंची ऑफर धुडकावणार?
Mahhi Vij
| Updated on: Nov 04, 2026 | 2:10 PM
Share

Bigg Boss 20: अभिनेता सलमान खान याचा ‘बिग बॉस 20’ हा वादग्रस्त शो सध्या तुफान रंगात आला आहे. सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस’चा यंदाचा आठवडा फार भावूक करणारा असणार आहे. कारण दिवाळीच्या या आठवड्यात स्पर्धकांना तब्बल 2 महिन्यांनंतर त्यांच्या कुटुंबियांचा आवाज ऐकता येणार आहे. आपल्या माणसांचा आवाज ऐकल्यानंतर सर्वच स्पर्धक भावूक होतात. पण याच दरम्यान अभिनेत्री माही वीज हिच्यासोबत फार मोठा गेम होतो. कारण पंजाबी अभिनेत्री लव्ह गिलची आई माही हिच्यावर निशाणा साधते आणि मोठा खुलासा करते…

लव्हच्या आईची ऑडिओ क्लिप शोमध्ये ऐकवण्यात आली. त्यांनी आपल्या मुलीवर भरभरून प्रेम तर व्यक्त केलंच, पण सोबतच माहीला चांगलेच खडे बोल सुनावले. लव्हची आई रागाच्या भरात पंजाबीमध्ये म्हणाली, “माही माझ्या वयाची आहे, तिने हे सर्व बोलण्याआधी विचार करायला हवा होता.” लव्हने आईचं हे बोलणं हिंदीत भाषांतरित करून माहीला सांगितलं.

लव्ह गिल म्हणाली, “आई म्हणाली की, जर स्काउट नसता तर मी हिला नग्न केलं असतं.” हा आरोप ऐकून माही हिला मोठा धक्का बसला आणि तिला रडू लागली. माही म्हणाली की, ती असं कधीच बोलली नव्हती आणि तिने ‘नंगा’ म्हणजेच नग्न या शब्दाचा वापर केलेला नाही.

माही वीज शो सोडणार?

घडलेल्या प्रकरणानंतर माहीने उदितीशी बोलताना असा इशारा दिला की, मेकर्स तिलाच टार्गेट करत आहेत. जर असं असेल, तर ती या शोमध्ये राहणार नाही आणि तिला पैसेही नको आहेत. माही वॉशरूममध्ये जाऊन रडते. ती म्हणते— “प्रत्येकजण एकमेकांसाठी बोलतो, मग प्रत्येक गोष्टीसाठी मलाच का टार्गेट केले जात आहे? माझीही बाहेर फॅमिली आहे जी मला पाहत आहे. मी येथे माझी इमेज खराब करण्यासाठी आलेले नाही. मी आता या शोमध्ये राहू शकत नाही.”

दुसरीकडे, इंटरनेटवर युजर्सनी माहीच्या खोटेपणाचा पर्दाफाश केला आहे. लव्ह-काशवीच्या एपिसोडनंतर माहीने ‘नंगा’ करण्याबाबतचं वक्तव्य केलं होतं. लव्हविरोधात माहीने हे स्टेटमेंट दिलं होतं. माहीचे डबल स्टँडर्ड म्हणजेच दोन तोंडी वागणूक पाहून लोकांनी तिला ट्रोल केलं आहे. युजर्सनी म्हटले की, तुम्ही काही बोलता, तर त्यावर कायम राहिले पाहिजे. तसेच माहीच्या खेळावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत…

माही आणि लव्ह यांच्यात झालेला हा एपिसोड पाहता, ‘विकेंड का वार’मध्ये सलमान खान यावर कसा रिएक्ट करणार हे पाहण्यासारखं असेल. गेल्या आठवड्यात सलमान खानने माहीची कानउघडणी केली होती. अभिनेता म्हणालेला की, ती अपेक्षेप्रमाणे खेळत नाहीये आणि फक्त गॉसिपिंगमध्येच बिझी असते.

Follow Us
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय