AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kamlesh Sawant : वडील खिळ्यांवर झोपायचे, त्यांच्या छातीवर…कमलेश सावंत यांनी सांगितला संघर्षकाळ

Kamlesh Sawant : 'दृश्यम' फेम कमलेश सावंत यांची परिस्थिती खूप हलाखीची होती. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत संघर्षकाळ सांगितला आहे.

Kamlesh Sawant : वडील खिळ्यांवर झोपायचे, त्यांच्या छातीवर...कमलेश सावंत यांनी सांगितला संघर्षकाळ
| Updated on: Nov 04, 2026 | 2:16 PM
Share

अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक कलाकारांना मोठा संघर्ष करावा लागतो. मनोरंजनविश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यापूर्वी त्यांना आर्थिक अडचणी, प्रतिकूल परिस्थिती आणि अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते कमलेश सावंत यांचाही प्रवास असाच संघर्षमय राहिला आहे. ‘दृश्यम’ चित्रपटातील गायतोंडे या भूमिकेमुळे ते विशेष लोकप्रिय झाले. कमलेश सावंत यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या वडिलांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव होता. कमलेश यांचे वडील रेल्वेमध्ये नोकरीला होते. त्यांना बॉडीबिल्डिंगची आवड होती.

कमलेश सावंत यांचा संघर्षकाळ

कमलेश सावंत म्हणाले की, ‘माझे वडील रेल्वेत कामाला होते. ते स्पोर्ट्स सेक्रेटरी होते. ते बॉडीबिल्डर होते. ते ड्रील एक्सरसाइजमध्ये भाग घ्यायचे. ते खिळ्यांवर झोपायचे आणि त्यांच्या छातीवर विटा ठेवल्या जायच्या, त्या विटा कोणीतरी हातोड्यानं मारून फोडायचा. ते सुयांवर उभे राहायचे आणि दुसरा माणूस त्यांच्या हातावर उभा राहायचा. ते या गोष्टी करायचे. आम्हाला कधीच ब्रेड-बटर खायला मिळाले नाही. आम्हाला नेहमी मोड आलेली कडधान्ये आणि चपाती मिळायची. चवीसाठी थोडं दूध, अंडी व थोडी साखर मिळायची. त्यामुळेच मी असा आहे.’

आर्थिक अडचणींबद्दल बोलताना कमलेश म्हणाले की, ‘माझी आई फक्त एकच साडी नेसायची. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलोय, माझे नातेवाईकही आमच्यासोबत राहायचे. माझ्या वडिलांचा पगार सर्वांसाठी आणि आमच्या शिक्षणासाठी पुरेसा नव्हता. तीन बहिणी, एक मोठा भाऊ आणि मी अशी आम्ही पाच भावंडं होतो. प्रत्येकाला सगळं समान मिळालं पाहिजे, असा प्रयत्न वडील करायचे. लहानपणी मला खूप भूक लागली की, मी एक केळ आणायचो, ते चपातीत गुंडाळून खायचो. कधीकधी मी चपातीमध्ये पारले-जी बिस्किटं भरून खायचो. अशा प्रकारे आम्ही तडजोड करायला शिकत मोठे झालो.’

‘माझे वडील वारल्यानंतर मी आणि माझी आई खालच्या मजल्यावरील चाळीत राहायचो, तर माझा भाऊ पहिल्या मजल्यावर राहायचा. तिथे फारसा खर्च नसायचा. आम्ही 10,000 ते 15,000 रुपयांत आमचा महिन्याचा खर्च भागवायचो, कारण आम्ही रेशन दुकानातून 2 रुपये किलोनं तांदूळ आणून खायचो. आईला वडिलांची पेन्शन मिळायची आणि माझी भावंडं दर महिन्याला खर्चासाठी आईला पैसे द्यायची.’ असं कमलेश यांनी शेवटी म्हटलं.’स्क्रीन‘ला दिलेल्या मुलाखतीत कमलेश सावंत बोलत होते.

Follow Us
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...