AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakhi Sawant: कॅटरिना कैफला मोटी म्हणून हिणवणाऱ्यांवर राखी भडकली, पार लायकी काढून ठेवली

Rakhi Sawant On Katrina Kaif: कॅटरिना कैफला वाढलेल्या वजनामुळे बरंच ट्रॉलिंगचा सामना करावा लागत आहे. आता यावर बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Rakhi Sawant: कॅटरिना कैफला मोटी म्हणून हिणवणाऱ्यांवर राखी भडकली, पार लायकी काढून ठेवली
| Updated on: Sep 20, 2026 | 8:58 AM
Share

नुकतेच कॅटरिना कैफच्या एका सार्वजनिक उपस्थितीनंतर सोशल मीडियावर तिच्या वाढलेल्या वजनावरून तिला ट्रोल केले जात होते. यावर राखी सावंतने कॅटरिना कैफची पाठराखण केली आहे. तिने कॅटरिनाला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत सुनावले की, “आई झाल्यानंतर महिलांच्या शरीरात बदल होणे सामान्य आहे आणि लोकांनी अशा गोष्टींवरून कोणालाही ट्रोल करू नये.”

खूप वर्षांपूर्वी राखी सावंतने आरोप केला होता की, कॅटरिना कैफने तिच्या ‘अग्निपथ’ सिनेमातील ‘चिकनी चमेली’ गाण्यात राखीच्या डान्स स्टेप्स कॉपी केल्या आहेत.  एका अवॉर्ड शोमध्ये कॅटरिनाच्या ‘शीला की जवानी’ गाण्यावर डान्स करताना राखी सावंतने विकी कौशलला असा काही ठुमका मारला की विकीचा पाय लचकला होता. त्यानंतर राखीने कॅटरिनाकडे जाहीर माफी मागितली होती. परंतु, सध्या राखी सावंतने जुने वाद बाजूला ठेवून कॅटरिनाला महिला म्हणून पूर्ण पाठिंबा दिला आहे.

कॅटरिनाने नुकतीच अंबानीच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात ती विकी कौशलसोबत गेली होती. यावेळी तिला तिच्या वाढलेल्या वजनामुळे अनेक ट्रॉलिंगचा सामना करावा लागला, तिला अनेकांनी जाडी, मोटी असं म्हणंत हिणवलं, कॅटरिनाचा या कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल झाले. यानंतर अनेकांनी कॅटरिनाला आपले समर्थन दर्शवले. गरोदरपणानंतर असं होणं स्वभाविक आहे अशी प्रतिक्रिया काहीनी व्यक्त केली.

वजन वाढल्यामुळे कॅटरिना कैफला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, कॅटरिनाचा सहकलाकार अली जफरने तिला उघडपणे पाठिंबा दिला आहे. खुशबू सुंदरनेही उघडपणे या अभिनेत्रीला पाठिंबा दर्शवला आहे. या ट्रोलिंगच्या दरम्यान, कॅटरिना कैफने तिच्या आयुष्यात झालेल्या बदलांविषयी सांगितले. तिने ट्रोलर्सना थेट उत्तर दिले नसले तरी, तिचे आयुष्य किती बदलले आहे याबद्दल अभिनेत्रीने सांगितले. ‘द हॉलीवूड रिपोर्टर’शी बोलताना कॅटरिना म्हणाली की, आई झाल्यापासून तिची त्वचा पूर्णपणे बदलली आहे. ती आता तिच्या त्वचेबद्दल अधिक जागरूक झाली आहे आणि तिला स्वतःची जास्त काळजी घ्यावी लागते. गरोदरपणानंतर माझी त्वचा खूप संवेदनशील झाली आहे. आता माझ्यासाठी कोणती उत्पादने योग्य आहेत आणि कोणती नाहीत हे समजणे खूप कठीण झाले आहे.”

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी