AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आगीच्या ज्वाला, धुराचे मोठे लोट, पाकिस्तानी हवाई हल्ल्याचा भयानक व्हिडीओ व्हायरल, थेट..

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानकडून मोठा हल्ला करण्यात आला. या हवाई हल्ल्याचे काही खळबळजनक व्हिडीओही पुढे आलीत. या हल्ल्यात तब्बल 400 लोकांचा जीव गेलाय.

आगीच्या ज्वाला, धुराचे मोठे लोट, पाकिस्तानी हवाई हल्ल्याचा भयानक व्हिडीओ व्हायरल, थेट..
Pakistan airstrike Afghanistan
| Updated on: Mar 17, 2026 | 10:51 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचलेला असतानाच भारताच्या शेजारी देशांमध्ये संघर्ष पेटला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्याकडून एकमेकांवर मोठे हल्ले केले जात आहेत. यादरम्यानच सोमवारी रात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये काबूलमधील एका रुग्णालयावर भीषण हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर मोठी आग लागली. निवासी भागात पाच मोठे हल्ले पाकिस्तानने केले. यामध्ये अफगाणिस्तानच्या गुप्तचर विभागाचे कार्यालयही टार्गेटवर होते. पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यानंतर 400 लोक ठार झाले. या हल्ल्याचा भयंकर बदला घेतला जाईल, असे तालिबानने सांगितले. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या हवाई तळांना टार्गेट करून हल्ला केला होता. त्यानंतर पुन्हा पाककडून हा घातक क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, तालिबान सरकारने म्हटले आहे की, रुग्णालयाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला असून मृतांचा आकड्यांमध्ये वाढ होऊ शकते. हवाई हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट होते की, पाकिस्तानने अफगाणिस्तावर केलेला हल्ला किती जास्त भयंकर होता. मात्र, आम्ही या व्हिडीओची पुष्टी करत नाहीत, सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यानंतरचा आहे, असा दावा करण्यात आला.

पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पाच ठिकाणांवर हल्ला केला. हा हल्ला केल्यानंतर आगीचे आणि धुराचे लोट हवेत दिसत आहेत. यावरून स्पष्ट होते की, पाकिस्तानकडून अत्यंत घातक असा हल्ला करण्यात आला. पाकिस्तानने केलेल्या या हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तानकडून अनेक ठिकाणी बचावकार्य राबवण्यात आले. मात्र, हल्ला इतका जास्त भयंकर होता की, बचावकार्यात अडथळा निर्माण झाला.

रुग्णालयावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर रुग्णालयाच्या इमारतीला भीषण आग लागली. काही व्हिडीओमध्ये लोक आगीच्या घटनेनंतर पळत येताना दिसत आहेत. सध्या जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. पुन्हा एकदा हा हल्ला करून पाकिस्तानने अफगाणिस्तानला पेटवून दिले. आता अफगाणिस्तान पाकिस्तानवर मोठा हल्ला करणार हे स्पष्टच आहे. या परिस्थितीवर भारताचे बारीक लक्ष आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल