AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा हाहाकार! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 400 लोक ठार, सीमेवरील तणाव वाढला, थेट..

अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध पेटलेले असतानाच दुसरीकडे भारताच्या शेजारी देशांमध्येही मोठा संघर्ष बघायला मिळत आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान एकमेकांवर मोठे हल्ले करताना दिसत आहेत. त्यामध्येच आता धक्कादायक माहिती पुढे येताना दिसत आहे.

मोठा हाहाकार! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 400 लोक ठार, सीमेवरील तणाव वाढला, थेट..
Pakistan airstrikes
| Updated on: Mar 17, 2026 | 7:50 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले असून मोठे हल्ले केले जात आहेत. या युद्धाचा फटका जगातील अनेक देशांना बसत असून युद्ध थांबवण्याची मागणी केली जात आहे. गॅस आणि कच्च्या तेलाची मोठी समस्या निर्माण झाली. आखाती देशांचे या युद्धात तीनतेरा वाजले आहेत. दुबईवर मोठे हल्ले होत आहेत. यादरम्यानच दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याचे बघायला मिळत आहे. सतत दोन्ही देश एकमेकांवर मोठे हल्ले करत आहेत. पाकिस्तानचे लष्कर तळ आणि हवाई तळ अफगाणिस्तानच्या निशाण्यावर दिसले. त्यामध्येच काल रात्री पाकिस्तानकडून अफगाणिस्तावर मोठा हवाई हल्ला करण्यात आला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील 20 दिवसांच्या युद्धामध्ये पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये पाच ठिकाणी मोठे हवाई हल्ले केले. ज्याने मोठी खळबळ उडाली.

पाकिस्तानी लष्कराने या हल्ल्यात जड स्फोटकांचा वापर केला आणि या पाच ठिकाणी मोठे हवाई हल्ले केले. मिळालेली अधिकची माहिती अशी की, पाकिस्तानी हवाई दलाने काल रात्री 9.३० वाजता JF-17 आणि F-16 विमानांचा वापर करून काबूलमध्ये हल्ले केले. यामध्ये अफगाण संरक्षण मंत्रालयाजवळील निवासाचा काही भाग, गुप्तचर संस्था GDI मुख्यालय, राष्ट्रपती भवनाजवळील निवासी भाग यासोबच काबूल विमानतळाच्या जवळ असलेल्या 2000 बेड असलेल्या सरकारी दवाखान्यावरही हवाई हल्ला करण्यात आला.

हेच नाही तर पाकिस्तानी हवाई दलाकडून मोठे क्षेपणास्त्र टाकत जीडीआयचे मुख्यालयही पेटवून देण्यात आले. सरकारी दवाखान्यावर केलेल्या हल्ल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या हवाई हल्ल्यानंतर सरकारी दवाखान्याला मोठी आग लागल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानकडून 23 मिनिटांमध्ये 5 ठिकाणांवर भीषण हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तब्बल 400 लोक ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

250 हून अधिक लोक जखमी झाली आहेत. काबूलसोबतच पाकिस्तानकडून नांगरहार प्रांतात देखील बॉम्बहल्ला करण्यात आला. पण या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. ऐन रमजानच्या महिन्यातच पाकिस्तानकडून इतके भयंकर हल्ले अफगाणिस्तानवर करण्यात आली आहेत.

Follow Us
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल