AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण-अमेरिका युद्धात मोठी खळबळ, थेट या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणला…

अमेरिका आणि इस्त्रायलने 28 फेब्रुवारी रोजी मोठा हल्ला इराणवर केला आणि त्यानंतर युद्ध पेटले. आज या युद्धाला 17 दिवस पूर्ण झाली आहेत. मात्र, युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. मोठा हाहाकार जगात सुरू आहे. यादरम्यानच आता फ्रान्सने मोठे विधान केले.

इराण-अमेरिका युद्धात मोठी खळबळ, थेट या देशाच्या  राष्ट्राध्यक्षांनी इराणला...
America Iran war
| Updated on: Mar 16, 2026 | 12:10 PM
Share

इराण आणि अमेरिकेच्या युद्धात आखाती देश संकटात आहेत. आखाती देशांवर मोठे हल्ले केले जात आहेत. मात्र, इराणकडून स्पष्ट शब्दात सांगण्यात आले की, आम्ही फक्त आखाती देशांमध्ये जिथे जिथे अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, तिथेच हल्ला करत आहोत, बाकी नाही. इस्त्रायलकडून हे षडयंत्र रचले जात असल्याचाही मोठा दावा इराणकडून करण्यात आला. आखाती देश या युद्धामुळे संकटात आहेत. तुर्कीवरही क्षेपणास्त्रांचा मारा इराणकडून करण्यात आला. तीन क्षेपणास्त्र इराणने तुर्कीवर टाकली. अमेरिकेला वाटले की, या युद्धात तुर्की देखील अमेरिकेच्या बाजूने उतरेल. मात्र, तुर्कीनेही थेट हात वर केले. ज्याने अमेरिकेला धक्का बसला. अमेरिकेच्या बाजूने एकही देश पुढे येताना दिसत नाहीये. यादरम्यान आता फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

सुरूवातीला सांगण्यात आले की, अमेरिकेच्या बाजूने या युद्धात फ्रान्स उतरत असून इराणच्या दिशेने फान्सची युद्धनाैका निघाली आहे. मात्र, फ्रान्सने असेही काहीही घडले नसल्याचे स्पष्ट केले. आता नुकताच फ्रान्सकडून इराणला मोठे आवाहन करण्यात आले. तात्काळ संयुक्त अरब अमिराती, कुवेत, कतार बहरीन यासारख्या देशांवरील हल्ले थांबवण्यास सांगितले आहे.

मॅक्रॉन यांनी इराणला इशारा देत म्हटले की, हल्ले थांबवावीत. कारण तणाव वाढत राहिला तर संपूर्ण प्रदेश अधिक अस्थिर होऊ शकतो. ज्याचे परिणाम दीर्घकाळ राहतील. या युद्धात एकही देश अमेरिकेच्या बाजूने होर्मुज खाडीत उतरत नाहीये. अमेरिकेने चीनसह फान्सलाही आपले सैन्य होर्मुज खाडीत पाठवण्याची विनंती केली. मात्र, अजूनही फ्रान्सने त्याला प्रतिसाद दिला नाही.

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी थेट म्हटले आहे की, प्रदेशातील इतर लोकांप्रमाणेच इराणचे लोकही त्याची किंमत चुकवत आहेत. फ्रान्स अमेरिकेच्या बाजूने या युद्धात मैदानात उतरणार असे सातत्याने सांगितले जात होते. शेवटी फ्रान्सकडून आपली बाजू मांडण्यात आली. इस्त्रायलकडून मोठे हल्ले केले जात असतानाही इराण हार मानताना दिसत नाही. अमेरिकाही इराणवर घातक हल्ले करत आहे.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...