AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणी देश मदतीला येईना… डोनाल्ड ट्रम्प पडले एकटे, थेट चीनसह नाटोलाच…

इराण आणि अमेरिका युद्धात कुठेतरी अमेरिका एकटी पडली आहे. नाटोसह अनेक देशांना अमेरिका मदत मागत आहे. मात्र, एकही देश अमेरिकेच्या मदतीला पुढे येत नाहीये. त्यामध्येच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून थेट मोठी धमकी देण्यात आली.

कोणी देश मदतीला येईना... डोनाल्ड ट्रम्प पडले एकटे, थेट चीनसह नाटोलाच...
Donald Trump
| Updated on: Mar 16, 2026 | 11:40 AM
Share

इराणसोबतच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांना एका मागून एक मोठे झटके बसताना दिसत आहेत. आजच्या घडीला कोणताही देश अमेरिकेच्या बाजूने उभा दिसत नाही. अमेरिकेने मदत मागूनही अनेक देशांनी थेट हातावर तुरी देत अमेरिकेच्या मदतीला उत्तर दिले नाही. कोणत्याही देशाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट बघायला मिळत आहे. होर्मुज खाडी जी इराणकडून बंद करण्यात आली ती सुरक्षित करण्याचे मोठे आव्हान आजच्या घडीला अमेरिकेपुढे मोठ्या डोंगराइतके आहे. मदत मागूनही एकही देश पुढे येत नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी आता थेट खूप वाईट भविष्याला समोरे जाण्याचा मोठा इशारा दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, जर कोणताही प्रतिसाद किंवा जर नकारात्मक प्रतिसाद मिळाला तर भविष्य नाटोसाठी खूप जास्त वाईट असेल. डोनाल्ड ट्रम्प यांना वाटले होते की, होर्मुज खाडीत इतर देश लगेचच आपले सैन्य पाठवतील. मात्र, एकही देश डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीकरिता पुढे येत नसल्याने त्यांच्याकडून थेट मोठी धमकीच देण्यात आली.

अमेरिकेने युक्रेनला रशियाच्याविरोधात पाठिंबा दिला होता आणि नाटोची बारी असल्याचे त्यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे बोलताना म्हटले की, मला वाटते की, चीनने मदत करायला हवी. कारण त्यांचे 90 टक्के तेल याच सामुद्रधुनीतून येते, त्यामुळे त्यांनी मदतीला पुढे यायला हवे. या मार्गाचा प्रामुख्याने फायदा घेणाऱ्या देशांनी काहीही चुकीचे होणार नाही, हे बघितले पाहिजे.

पुढे बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, जर चीनने याकरिता आम्हाला मदत केली नाही तर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत असलेली नियोजित शिखर परिषद आम्ही पुढे ढकलू. एकप्रकारे आता अमेरिकेकडून चीनवर दबाव टाकण्याचे काम सुरू आहे. अगोदरच चीन या युद्धात इराणच्या बाजूने आहे. इराणकडून तसा खुलासाही करण्यात आला. मात्र, होर्मुज खाडीत अमेरिकेला चीनला उतरवायचे आहे.

होर्मुज मार्गाने चीनमध्ये कच्चे तेल दाखल होते. मात्र, जर चीन येथे अमेरिकेच्या बाजूने होर्मुज खाडीत उतरला तर समीकरण वेगळे होईल. फक्त चीनच नाही तर ज्या ज्या देशांकडून डोनाल्ड ट्रम्प यांनी मदत मागितली, ज्यापैकी एकही देश चीनच्या मदतीला यायला तयार नाही. त्यामध्येच आता नाटो देशांनाही थेट डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!