tv9 Marathi Special Report | राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या जिल्ह्यात सिलेंडरसाठी रांगा
राज्यात घरगुती गॅसच्या उपलब्धतेवरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून तुटवड्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. मात्र, त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात काही ठिकाणी वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
राज्यात घरगुती गॅसच्या उपलब्धतेवरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून तुटवड्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. मात्र, त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात काही ठिकाणी वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्य सरकार आणि पुरवठा विभाग राज्यात कुठेही गॅसचा तुटवडा नसल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी रांगा लावाव्या लागत असल्याचे चित्र समोर येत आहे. विशेष म्हणजे, ही परिस्थिती पुरवठा मंत्री भुजबळ यांच्या जिल्ह्यातच दिसून येत आहे. भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील घरगुती गॅसची रोजची मागणी सुमारे 9 हजार मेट्रिक टन असून ती वाढवून 11 हजार मेट्रिक टनपर्यंत करण्यात आली आहे. तरीही अनेक ठिकाणी गॅससाठी रांगा का लागत आहेत, याबाबत स्पष्ट उत्तर त्यांनी दिलेले नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी हॉटेल्सनंतर इतर व्यवसायांवरही परिणाम होऊन बेरोजगारी वाढू शकते, अशी शक्यता व्यक्त करणारे भुजबळ यांनी आता नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष परिस्थिती आणि सरकारच्या दाव्यांमध्ये तफावत असल्याचे चित्र समोर येत आहे.
Published on: Mar 17, 2026 11:06 AM
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत

