AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | अजित पवार परत आले असते तर ऑपरेशन लोटसचा पराभव झाला असता – संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

Sanjay Raut | अजित पवार परत आले असते तर ऑपरेशन लोटसचा पराभव झाला असता – संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

| Updated on: Feb 03, 2026 | 10:51 AM
Share

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण व्हावे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार या दोघांचीही होती, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. मात्र या विलीनीकरणात भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अडथळा ठरत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडणे हा भाजपचा पूर्वनियोजित डाव होता. जर अजित पवार यांनी भाजपची साथ सोडून पुन्हा शरद पवार यांच्याकडे परत येण्याचा निर्णय घेतला असता, तर तो भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’चा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव ठरला असता, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. “आजच्या घडीला जो कोणी भाजपच्या विरोधात उभा राहतो, त्याला एकतर तुरुंगात टाकले जाते किंवा त्याच्या जीवाला धोका निर्माण होतो,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या संशयास्पद विमान अपघाताच्या घटनेचा उल्लेख करत सवाल उपस्थित केला आहे, “हा अपघात अपघातच होता की त्यामागे ‘ऑपरेशन लोटस’चा काही भाग आहे?” असा थेट प्रश्न विचारत त्यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे आरोप केले आहे.

Published on: Feb 03, 2026 10:51 AM