AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह हेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; काँग्रेसच्या बड्या नेत्याने भाजपला डिवचलं

Amit Shah : राज्यातील विधानसभा निवडणूकीतील शानदार विजयानंतर गेल्या वर्षी आजच्यात दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र आता काँग्रेसच्या बड्या नेत्याने महायुती सरकारवर सडकून टीका केली आहे.

अमित शाह हेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; काँग्रेसच्या बड्या नेत्याने भाजपला डिवचलं
amit shah and fadnavisImage Credit source: TV 9 Marathi
| Edited By: | Updated on: Dec 05, 2025 | 6:59 PM
Share

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीत महायुतीने शानदार विजय मिळवला होता. या विजयानंतर 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आज महायुती सरकारच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे महायुतीच्या आणि खासकरून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला डिवचलं आहे. अमित शाह हेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा टोला सपकाळ यांनी भाजपला लगावला आहे. सपकाळ यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

अमित शहा हे खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका करताना म्हटले की, ‘केंद्रीय गृह मंत्री अमित शहा हे खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. कोणासोबत युती करायची ते अमित शहा ठरवतात, पालक मंत्री कोण याचा सुद्धा निर्णय ते घेतात. देवेंद्र फडणवीस हे नामधारी मुख्यमंत्री आहेत. या सरकारने वर्षपूर्तीमध्ये काहीही केलं नाही.’

महाराष्ट्रात टोळी युद्ध सुरू आहे

पुढे बोलताना सपकाळ यांनी म्हटले की, ‘राज्यात गुन्हेगारी वाढत आहे, त्यावर मंत्र्यांचे उत्तर हास्यास्पद असते. महाराष्ट्राच्या इतिहासातील हे सगळ्यात लाचार सरकार आहे. महाराष्ट्रात टोळी युद्ध सुरू आहे. पुढच्या वर्षात तरी त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावी अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र दिवाळखोरीला लागले आहे, त्यामुळे केंद्र सरकार कडून त्यांनी निधी आणावा. औरंगजेब जसा क्रूर कर्मा होता तशी स्थिती दिसते. पुढच्या कालावधीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. वैयक्तिक शुभेच्छा नाहीत, लोकांच्या हितासाठी शुभेच्छा आहेत.’

शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही

याच पत्रकार परिषदेला विजय वडेट्टीवारही उपस्थित होते. त्यांनी म्हटले की, वर्षपूर्तीच्या निमित्ताने अनेक प्रश्न समोर येत आहेत. लाडक्या बहि‍णींपासून लाडक्या कंत्राटदार पर्यंत पोहचले आहेत. अनेक कंत्राटदारांना कोट्यवधींची कामे देत खैरात वाटली. महाराष्टात यांनी कोणते दिवे लावले, शेतकरी आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांना मदती संदर्भात प्रस्ताव आला नाही असं केंद्रीय मंत्री सांगतात. मग कोण खोटं बोलत आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Follow Us
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत