AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market: देवच पावला… अवघ्या काही मिनिटात कमावले 3.90 कोटी; शेअर बाजारात गेलेल्या प्रत्येकाचा फायदाच फायदा

जागतिक पातळीवरील संमिश्र संकेत आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, देशांतर्गत शेअर बाजारात आज तेजी दिसून येत आहे.

Share Market: देवच पावला... अवघ्या काही मिनिटात कमावले 3.90 कोटी; शेअर बाजारात गेलेल्या प्रत्येकाचा फायदाच फायदा
| Updated on: Jul 29, 2026 | 10:55 AM
Share

जागतिक पातळीवरील संमिश्र संकेत आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, देशांतर्गत शेअर बाजारात आज तेजी दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 800 अंकांनी वधारला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टी 50 निर्देशांकाने 24,200 चा टप्पा ओलांडला. सकाळी 9:40 वाजता, सेन्सेक्स 777.71 अंकांनी किंवा 1.01% नी वाढून 77.543.63 वर व्यवहार करत होता. निफ्टीदेखील 218.85 अंकांनी किंवा 0.91 % नी वाढून 24,204.20 वर पोहोचला. दरम्यान, सुरुवातीच्या व्यवहारात रुपया डॉलरच्या तुलनेत 12 पैशांनी वधारून 95.70 वर उघडला. सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअर्स वाढीसह उघडले.

सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये, देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे शेअर्स आज 4.09 टक्क्यांच्या सर्वाधिक वाढीसह उघडले. तर, पॉवरग्रिडचे शेअर्स आज 0.60 टक्क्यांच्या सर्वाधिक घसरणीसह उघडले. इन्फोसिसचा शेअर 3.56% वाढीसह सर्वाधिक वाढलेला शेअर ठरला. एल अँड टी, टीसीएस, हिंदुस्थान युनिलिव्हर, इटरनल, टेक महिंद्रा, भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स यांच्या शेअर्समध्येही लक्षणीय वाढ दिसून आली. दुसरीकडे, मारुती, टायटन, एनटीपीसी, एशियन पेंट्स, इंडिगो आणि पॉवरग्रिड यांचे शेअर्स घसरणीसह उघडले. निफ्टीमध्ये इन्फोसिस, लार्सन अँड टुब्रो आणि इटरनल हे सर्वाधिक वाढलेले शेअर्स होते. व्यापक बाजारात, निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉलकॅप अनुक्रमे 0.54 टक्के आणि 0.66 टक्क्यांनी वधारले होते. क्षेत्रीय स्तरावर, निफ्टी आयटी आणि निफ्टी केमिकल्सने चांगली कामगिरी केली, तर निफ्टी रिअल्टी आणि निफ्टी ऑइल अँड गॅसने निराशाजनक कामगिरी केली.

कच्च्या तेलात वाढ दरम्यान, पश्चिम आशियातील नव्याने निर्माण झालेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. अमेरिकेच्या लष्कराने इराणवर प्रत्युत्तरात्मक हल्ले केल्याचे म्हटले आहे. यामुळे काही दिवसांची शांतता संपुष्टात आली आणि ऊर्जा पुरवठ्यातील व्यत्ययाबद्दल पुन्हा चिंता वाढली आहे. ब्रेंट क्रूड 5 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल सुमारे 88 डॉलरवर पोहोचले. मात्र, सुरुवातीच्या व्यवहारात ते घसरून प्रति बॅरल 84 डॉलरवर आले.

दुसरीकडे, बुधवारी मारुती सुझुकीचे शेअर्स 0.46 टक्क्यांनी, इंडिगोचे 0.23 टक्क्यांनी, अदानी पोर्ट्सचे 0.18 टक्क्यांनी, एशियन पेंट्सचे 0.10 टक्क्यांनी, एनटीपीसीचे 0.07 टक्क्यांनी, ट्रेंटचे 0.05 टक्क्यांनी आणि ॲक्सिस बँकेचे 0.04 टक्क्यांनी घसरले.

Follow Us
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?