AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मामाने मांडीवर बसवलं अन्..; टीव्हीच्या सर्वांत महागड्या अभिनेत्रीचं लैंगिक शोषण, स्वत:च केला खुलासा

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवांगी जोशीने तिच्यासोबत घडलेला अत्यंत धक्कादायक प्रसंग सांगितला. 'लॉक अप 2' या शोमध्ये तीला हा प्रसंग सांगताना अश्रू अनावर झाले होते.

मामाने मांडीवर बसवलं अन्..; टीव्हीच्या सर्वांत महागड्या अभिनेत्रीचं लैंगिक शोषण, स्वत:च केला खुलासा
शिवांगी जोशीImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 29, 2026 | 10:35 AM
Share

पहिल्या सिझनच्या प्रचंड यशानंतर आता ‘लॉक अप’चा दुसरा सिझनसुद्धा चांगलाच चर्चेत आला आहे. या शोमधील स्पर्धक त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे करत आहेत. अशातच ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवांगी जोशी हिनेसुद्धा नुकत्याच एका एपिसोडमध्ये तिच्या आयुष्यातील नकारात्मक अनुभव सांगितला आहे. लहानपणी मामानेच कशापद्धतीने लैंगिक शोषण केलं होतं, त्याचा धक्कादायक खुलासा तिने या शोमध्ये केला आहे. शिवांगीने सांगितलं की ती व्यक्ती तिच्या आईचा सावत्र भाऊ होता आणि त्याला ती ‘मामाजी’ असं म्हणायची. जेव्हा ती मुंबईला येण्याची तयारी करत होती, तेव्हा तिच्यासोबत ही घटना घडली होती.

या एपिसोडमध्ये शिवांगी म्हणाली, “मला त्या व्यक्तीने सांगितलं की, जर तुला अभिनेत्री व्हायचं असेल तर गाडी चालवता आली पाहिजे. गाडी चालवण्याचं प्रशिक्षण देताना त्याने मला त्याच्या मांडीवर बसायला सांगितलं आणि गाडी कशी चालवायची हे दाखवलं. मी त्याच्या मांडीवर बसले होते आणि माझ्यासोबत काय होतंय हेच मला कळत नव्हतं. पण एका क्षणानंतर मला खूप असहजपणा जाणवत होता.” हे सांगताना तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. यावेळी शिवानीने तिच्यासोबत घडलेली आणखी एक घटना सांगितली.

एके रात्री तिचे आईवडील घरी नसताना तो माणूस तिच्या घरी आला होता. शिवांगी म्हणाली, “तो मला समजावून सांगू लागला की, बाळ.. तू मुंबईला जाणार आहेस. तिथे असंच होतं. अचानक त्याने मला जवळ बोलावलं आणि मला पकडू लागला. अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी मला इंटिमेट सीनसाठी तयार राहावं लागेल, असं तो मला सांगत होता. जशी तुझी आई तुझ्या कपाळावर चुंबन घेते, तसंच शूटिंगदरम्यानही करावं लागेल, असं तो म्हणाला. हे सर्व सांगताना त्या व्यक्तीने मर्यादा ओलांडली आणि बळजबरीने माझं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच मी त्याला दूर ढकललं. पण त्या व्यक्तीने रागाच्या भरात मलाच जोरात खाली ढकललं.”

सुदैवाने त्याचवेळी शिवांगीचे आई-वडील तिथे आले आणि त्यांना घडलेल्या प्रकाराविषयी समजताच त्यांनी त्या व्यक्तीला बेदम मारहाण करून घरातून हाकलून दिलं. या घटनेमुळे शिवांगी इतकी घाबरली होती की ती काही दिवस शाळेतसुद्धा गेली नव्हती.

Follow Us
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला