तरुणाने तरुणीवर गोळ्या धाडधाड गोळ्या झाडल्या आणि जीवन संपवले..
दरम्यान, या गोळीबारामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांच्या तपासानंतरच घटनेमागील नेमकं कारण आणि संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.

अहिल्यानगर – एका तरुणाने भर दुपारी एकविरा चौकात तरुणीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनंतर शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात या तरुणाने नंतर स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवल्याचे म्हटले जात आहे. या हत्येमागील कारणांचा उलगडा झाला नसला तरी यामागे प्रेम प्रकरण असल्याचे उघडकीस आले आहे.
अहिल्यानगरमध्ये भरदिवसा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने एका तरुणीवर गोळी झाडून नंतर स्वतः वर गोळी झाडून जीवन संपल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधाच्या कारणातून तरुणीवर गोळीबार करण्यात आल्याची चर्चा आहे. या घटनेतील जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुर आहेत.
अहिल्यानगर शहरातील एकविरा चौक येथे राहणाऱ्या दिपाली चंद्रशेखर काळे या तरुणीवर योगेश सोमनाथ डोंगरे याने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. तरुणीवर गोळीबार केल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला आणि त्यानंतर त्याने शहराच्या जवळ असलेल्या कापूरवाडी परिसरात जाऊन स्वतःवरही गोळ्या झाडून घेत जीवन संपविल्याचे प्राथमिक माहिती आहे. या घटनेत दिपाली काळे जखमी गंभीर झाल्या असून, त्यांना तातडीने अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून तरुण योगेश डोंगरे याचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या गोळीबारामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांच्या तपासानंतरच घटनेमागील नेमकं कारण आणि संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.
