AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई करायची माळीकाम, लेकाने क्रिकेटमध्ये कमावलं नाव; आता BCCI ने दिली मोठी जबाबदारी, कोण आहे ‘हा’ खेळाडू?

Parvinder Awana News: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ज्युनियर निवड समितीबाबतही एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. भारताचे माजी वेगवान गोलंदाज परविंदर आवना हे ज्युनियर समितीचे नवे अध्यक्ष बनले आहेत.

आई करायची माळीकाम, लेकाने क्रिकेटमध्ये कमावलं नाव; आता BCCI ने दिली मोठी जबाबदारी, कोण आहे 'हा' खेळाडू?
| Updated on: Oct 23, 2026 | 11:21 PM
Share

नोएडाच्या हरोला गावातून आयपीएलच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवलेल्या परविंदर आवाना यांचे नशीब पालटले आहे. बीसीसीआयने या माजी वेगवान गोलंदाजावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांची ज्युनियर निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २३ ऑक्टोबर रोजी दुपारी या ४० वर्षीय माजी वेगवान गोलंदाजाच्या नावाची घोषणा केली आहे.

‘हरोला एक्सप्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आवाना परविंदर आवाना यांच्या नेतृत्वाखालील या निवड समितीत वेगवेगळ्या विभागांसाठी निवडकर्ता म्हणून नियुक्त झालेले कृष्णा दास, राकेश पटेल आणि एन. अर्जुन यादव यांचाही समावेश आहे. परविंदर आवाना यांनी भारतासाठी दोन टी-२० सामनेही खेळले होते. पण त्यांना फारशा संधी मिळाल्या नाहीत. त्यांनी २०१८ मध्ये वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली.

उत्तर प्रदेशातील नोएडाचा रहिवासी असलेल्या परविंदरचे वडील तो अवघ्या १४ वर्षांचा असतानाच निधन पावले. त्यानंतर त्यांच्या आईने अत्यंत कठीण परिस्थितीत त्याचे पालनपोषण केले. त्यांची आई नोएडा प्राधिकरणात माळी म्हणून काम करत असे. त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनीच आपल्या मुलाला एक क्रिकेटपटू म्हणून घडवले.

परविंदर आवानांनी २००४ मध्ये ईएसपीएन महिंद्रा स्कॉर्पिओ स्पीडस्टर टॅलेंट हंट जिंकली. जिथे त्यांना सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले. यानंतर त्यांना ऑस्ट्रेलियामध्ये माजी वेगवान गोलंदाज डॅमियन फ्लेमिंग यांच्यासोबत प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. परविंदर आवानांनी २० डिसेंबर २०१२ रोजी पुण्यात इंग्लंडविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

त्यांचा पुढचा सामना मुंबईत झाला. जो इंग्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना होता. हा त्यांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. अवानांनी आपला पहिला प्रथम-श्रेणी सामना १ डिसेंबर २००७ रोजी खेळला. २००७ ते २०१६ पर्यंत, त्यांनी दिल्लीचे प्रतिनिधित्व केले. २९.२३ च्या सरासरीने १९१ प्रथम-श्रेणी बळी घेतले. त्यांचा शेवटचा सामना थुंबा येथे झारखंडविरुद्ध झाला.

आवाना आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून खेळला. त्याचा शेवटचा सामना बंगळूरु येथे खेळला गेलेला २०१४ हंगामाचा अंतिम सामना होता. त्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने किंग्स इलेव्हन पंजाबला तीन गडी राखून पराभूत करून विजेतेपद पटकावले. निवृत्तीनंतर परविंदर आवाना यांनी प्रशिक्षणाच्या क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी दिल्लीच्या U16, U19 आणि U23 संघांसोबतच, भारत U19 संघ आणि BCCI/सेंटर ऑफ एक्सलन्सच्या अनेक उच्च-कार्यक्षमता कार्यक्रमांमध्ये काम केले आहे.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…