Nashik| सोहळ्यांसाठी 50 टक्के उपस्थितीची मर्यादा पाळा; नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

| Updated on: Dec 26, 2021 | 12:07 PM

ओमिक्रॉनचा वाढता धोका लढात घेता नागरिकांनी खासगी समारंभासाठी 50 टक्के उपस्थितीची मर्यादा पाळावी, असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

Nashik| सोहळ्यांसाठी 50 टक्के उपस्थितीची मर्यादा पाळा; नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक (सौजन्यः गुगल)
Follow us on

नाशिकः ओमिक्रॉनचा वाढता धोका लढात घेता नागरिकांनी खासगी समारंभासाठी 50 टक्के उपस्थितीची मर्यादा पाळावी. हॉटेल, उपहारगृह, चित्रपटगृह, विवाह सोहळा यावेळी कमी गर्दी ठेवावी, असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे. राज्य सरकराने कोरोना प्रतिबंधासाटी नवे नियम लागू केले आहेत. त्याचे पालन करावे, असे त्यांनी म्हटले आहे. शिवाय त्यांनी ही नियमावली ग्रामीण भागात लागू केली आहे. मात्र, शहरी हद्दीत पोलीस कधी नियमांची अंमलबजावणी सुरू करतात, याकडे लक्ष लागले आहे.

हे नियम जरूर पाळा

राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावले आहेत. त्यानुसार संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते. इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखीलउपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते. या दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशा ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल. तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी 25 टक्के उपस्थिती असेल, या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

उपस्थितांची संख्या निश्चिती

क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल. वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना 27 नोव्हेंबर 2021 चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल. उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच 50 टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.

ओमिक्रॉनचा वाढता धोका लढात घेता नागरिकांनी खासगी समारंभासाठी 50 टक्के उपस्थितीची मर्यादा पाळावी. हॉटेल, उपहारगृह, चित्रपटगृह, विवाह सोहळा यावेळी कमी गर्दी ठेवावी. राज्य सरकराने कोरोना प्रतिबंधासाटी नवे नियम लागू केले आहेत. त्याचे पालन करावे.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

इतर बातम्याः

Nashik NCP|आधी वाहनतळ, मगच टोइंग; नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, आंदोलनाचा इशारा

राज्यातल्या पहिल्या बैलगाडा शर्यतीप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेच्या माजी आमदारावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल