Nashik NCP|आधी वाहनतळ, मगच टोइंग; नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, आंदोलनाचा इशारा

नाशिकमध्ये वाहनतळ नसल्याने अनेक वाहने रांगेत रस्त्याच्या कडेला उभी असल्याने टोइंग कर्मचारी एकही वाहन न सोडण्याच्या लोभामुळे घाईगर्दीने वाहने चुकीच्या पद्धतीने टोइंग करतात. यामुळे अनेक वाहनांचे नुकसान होते.

Nashik NCP|आधी वाहनतळ, मगच टोइंग; नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, आंदोलनाचा इशारा
नाशिकमध्ये पोलिसांची टोइंग कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. (सौजन्य-गुगल)
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 7:05 AM

नाशिकः नाशिकमध्ये पोलिसांच्या टोइंग कारवाईला विरोध होतोय. शहरात आधी अधिकृत वाहनतळ निर्माण करा आणि त्यानंतर टोइंगची कारवाई सुरू करा, अशी मागणी करत राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. प्रशासनाने याप्रकरणी म्हणणे नाही ऐकले, तर आंदोलन छेडू असा इशाराही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादस खैरे यांनी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांना दिला आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात हा प्रश्न चर्चेत राहणार आहे.

नेमके प्रकरण काय?

नाशिकमधील मुख्य बाजारपेठेजवळ वाहनतळ नाही. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. काही पर्याय नसल्याने नाविलाज म्हणून वाहनधारक आपले वाहन रस्त्याच्या कडेला उभे करतात. मात्र, अशी वाहने पोलिसांकडून टोइंग केली जातात. त्यापोटी वाहनधारकांकडून दंड वसूल केला जातो. दंडाच्या नावाखाली काही टोइंग कर्मचाऱ्यांनी आपला धंदा सुरू केला आहे. यामुळे सरकारी तिजोरीवरही याचा फटका बसत आहे.

चुकीच्या पद्धतीने टोइंग

नाशिकमध्ये वाहनतळ नसल्याने अनेक वाहने रांगेत रस्त्याच्या कडेला उभी असल्याने टोइंग कर्मचारी एकही वाहन न सोडण्याच्या लोभामुळे घाईगर्दीने वाहने चुकीच्या पद्धतीने टोइंग करतात. यामुळे अनेक वाहनांचे नुकसान होते. वाहनधारकाने याबाबत जाब विचारल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीचे कर्मचारी त्यांना अपमानास्पद वागणूक देतात. अरेरावीची भाषा करतात. अनेकदा वाहनधारक व कर्मचाऱ्यांमध्ये रस्त्यांवरच जुपते. कोरोनामुळे अनेक व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला असताना टोइंगच्या भीतीने ग्राहक खरेदी करिता जात नाहीत.

नुसता स्मार्ट गाजावाजा

नाशिक शहरात रस्त्यावर वाहनतळ सुरू करण्याचा गाजावाजा स्मार्ट सिटीने केला. परंतु सद्यस्थितीत महापालिकेचे अधिकृत वाहनतळ नसल्याने वाहनधारक संभ्रमात पडले आहेत. नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठेजवळ अधिकृत वाहनतळ उभारल्यानंतरच वाहन टोइंग सुरू करावी, तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोइंग कर्मचाऱ्यांवर कारवाई करून अनधिकृत टोइंगच्या नावाखालील धंदा बंद करण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांना पक्षाच्या वतीने तसे पत्रही देण्यात आले आहे.

दुजाभाव नको सध्या नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी शहरात हेल्मेटसक्ती सुरू केली आहे. दुसरीकडे गेल्याच महिन्यात एकाच आठवड्यात शहरात तीन खून आणि दरोडेही पडले. यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. पोलीस आयुक्तांनी तिकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. त्यांनी कारवाई जरूर करावी. मात्र, त्यातही दुजाभाव नको. अनेक पोलीस हेल्मेट घालत नाहीत. त्यांना सूट का, असा सवाल विचारला जातोय. विशेष म्हणजे आता वाहनतळ नसताना नागरिकांवर कारवाई म्हणजे हे अतीच झाले, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

इतर बातम्याः

University of Health Sciences | समाजासाठी काय करू शकतो याचे चिंतन करा, कुलगुरू डॉ. कानिटकर यांचे आवाहन

नाशिकमध्ये परवानगीविनाच भिर्रर्र…आयोजक सत्ताधारी शिवसेनेचे माजी आमदार, कोरोनाचे नियम पायदळी

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.