Nashik Corona | नाशिक महापालिका जिनोम सिक्वेन्सिंग करणार बंद, 10 हजार किट्सची खरेदीही रद्द, कारण काय?

| Updated on: Jan 18, 2022 | 12:18 PM

नाशिक जिल्हा रुग्णालय, मालेगाव जिल्हा रुग्णालय, पिंपळगाव रुग्णालयासोबतच कळवण, नांदगाव, येवला, इगतपुरी, वणी, सुरगाणा, पेठ येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत.

Nashik Corona | नाशिक महापालिका जिनोम सिक्वेन्सिंग करणार बंद, 10 हजार किट्सची खरेदीही रद्द, कारण काय?
Corona testing
Follow us on

नाशिकः सध्या देशभरात कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढत आहेत. कोरोनाची पहिली लाट आणि त्यापेक्षा दुसरी लाट जास्त तीव्र आणि भयानक होती. याच्या कटू आठवणी आजही वेदना देतात. मात्र, या साथीतून आपण बरेच काही शिकलो. कुठे खचलो, तर कुठे मजबूत झालो. या विषाणूसोबतची लढाई इतक्या लवकर संपणार नाही. त्यामुळे त्याच्यासोबत लढतानाचे डावपेचही बदलावे लागतात. हेच ध्यानात घेता आता नाशिक महापालिका जिनोम सिक्वेसिंग बंद करणार आहे. त्यासाठी 10 हजार किट्सची खरेदीही रद्द केलीय. जाणून घेऊयात नेमके कारण.

नेमके कारण काय?

नाशिकमध्ये डिसेंबर महिन्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा पहिला रुग्ण सापडला. त्यामुळे प्रशासनाची पाचावर धारण बसली. त्यांनी नाना धावपळी सुरू केल्या. रुग्णाचा जिनोम सिक्वेन्स तपासून पुण्याच्या शासकीय प्रयोगशाळेतून खात्री करून घेण्याचे ठरले. ओमिक्रॉन टेस्टसाठी येणाऱ्या काळात दहा हजार किट् खरेदी करण्याचा निर्णयही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत घेतला. मात्र, आता बहुतांश रुग्ण ओमिक्रॉनचेच आढळत आहेत. बर त्यांचा डेल्टा इतका जास्त धोकाही नाही. हे पाहता महापालिकेने जिनोम स्किक्वेसिंग बंद करण्याचा निर्णय घेतला असून, किट्सची खरेदीही रद्द केली आहे.

कोविड सेंटर सुरू

राज्य टास्क फोर्स आणि मुख्य सचिवांनी घेतलेल्या आढाव्यात 12 ते 15 जानेवारीदरम्यान कोरोना रुग्णांची संख्या दीडपट वाढण्याची भीत व्यक्त केली होती. नाशिक जिल्ह्यात आता तो अंदाज खरा ठरताना दिसत आहे. ग्रामीण भागातही कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. दक्षतेचा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यात सोळा कोविड केअर सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहेत. त्यात नाशिक जिल्हा रुग्णालय, मालेगाव जिल्हा रुग्णालय, पिंपळगाव रुग्णालयासोबतच कळवण, नांदगाव, येवला, इगतपुरी, वणी, सुरगाणा, पेठ येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी तब्बल अठराशे खाटांची संख्या उपलब्ध आहे. शिवाय ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा आहे.

ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण

नाशिकमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. ऑक्सिजनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना रांगा लावाव्या लागल्या. वणवण फिरावे लागले. हे पाहता या लाटेत कसलाही त्रास होऊ नये म्हणून महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट पालिकेने उभारल्याची माहिती स्वतः महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. त्यामुळे केवळ 13 मेट्रीक टन ऑक्सिजनची क्षमतेवरून पालिकेने तब्बल 3 कोटी रुपये खर्चून 140 मेट्रीक टन क्षमतेच्या ऑक्सिजन प्लांटपर्यंत मजल मारली आहे.

इतर बातम्याः

Nashik | नाशिकमध्ये कोरोना मृत्यूंची आकडेवारी लपवली का; बळींच्या रेकॉर्डमध्ये पावणेतीन हजारांची भर कशी?

Nashik | आजपासून कडक हेल्मेटसक्ती; पहिल्यांदा पाचशेचा दंड, दुसऱ्यांदा खोड मोडणारी कारवाई होणार

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटेला 40 वर्षे पूर्ण; आजवर 64 संमेलनांचे आयोजन, पर्यावरण चळवळीच्या अनोख्या कार्याला उजाळा…!