Nashik | आजपासून कडक हेल्मेटसक्ती; पहिल्यांदा पाचशेचा दंड, दुसऱ्यांदा खोड मोडणारी कारवाई होणार

Nashik | आजपासून कडक हेल्मेटसक्ती; पहिल्यांदा पाचशेचा दंड, दुसऱ्यांदा खोड मोडणारी कारवाई होणार
नाशिकमध्ये हेल्मेटसक्ती सुरू करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये ऑगस्ट महिन्यात 9 दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. तर वर्षभरात 124 जणांंचा मृत्यू झाला. त्यातील 111 जणांनी हेल्मेट घातले नव्हते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Jan 18, 2022 | 10:27 AM

नाशिकः नाशिकमध्ये ऑगस्ट 2021 पासून हेल्मेटसक्ती सुरू करण्यात आली. मात्र, ही मोहीम अधिक कडक राबण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) यांनी 22 डिसेंबर रोजी आदेश दिले असून, आज 18 जानेवारीपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. त्यामुळे दुचाकीवरून घराबाहेर पडताना डोक्यावर हेल्मेट आहे की नाही, हे जाणून घ्या. अन्यथा पहिल्यांदा 500 रुपयांचा दंड होऊ शकतो. दुसऱ्यांदा मात्र, अद्दल घडेल अशी कारवाई होणार आहे. ती नेमकी कोणती, हे जाणून घेऊयात.

समुपदेशन ते परीक्षा

नाशिकमध्ये ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट, नो पट्रोल मोहीम सुरू केली. त्यानंतर दुचाकीस्वारांचे समुपदेशन सुरू केले. त्यांची परीक्षाही घेण्यात आली.

प्राचार्यावरही गुन्हा

शेवटचा उपाय म्हणून नाशिक शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये आता विनाहेल्मेट प्रवेश दिला जाणार नाही. तसे आदेशच त्यांनी काढले आहेत. 8 नोव्हेंबरपासून हे आदेश लागू करण्यात आले. त्यानंतरही अनेक कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकी चालकांना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळेच दंत महाविद्यालयाचे मालमत्ता अधिकारी अशोक हिरे आणि एचपीटी कॉलेजचे प्राचार्य प्रा. व्ही. एन. सूर्यवंशी यांच्याविरोधात पोलीस अधिनियम कलम 131 ब (1) अन्वये गु्न्हा दाखल करण्यात आला. येणाऱ्या काळात ही कारवाई तीव्र करण्याचे संकेत पोलीस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

आता थेट लायसन्स रद्द

पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी आता गंभीर होत पुन्हा कडक हेल्मेटसक्ती सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्यांदा नियम मोडल्यास 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यानंतरही चालकाने हेल्मेट घातले नसले, तर त्याचे थेट लायसन्स रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना याचा चांगलाच भुर्दंड बसू शकतो. या नियमाची अंमलबजावणी कशी होते आणि नाशिकर त्याला कसा प्रतिसाद देतात, हे पाहावे लागेल.

आजपर्यंतची कारवाई…

– नाशिकमध्ये गेल्या वर्षी  2021 मध्ये 116 दुचाकी अपघात.

– या अपघातामध्ये तब्बल 124 जणांचा झाला मृत्यू.

– मृतातील 111 जणांनी हेल्मेट घातलेले नव्हते.

– ऑगस्ट महिन्यात 9 जणांचा मृत्यू.

– ऑगस्टपासून हेल्मेटसक्ती सुरू करण्यात आली.

– नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान विशेष अभियान राबवले गेले.

– अभियानात तब्बल 10 हजार 561 दुचाकीस्वारांचे समुपदेशन.

इतर बातम्याः

Nashik | भुजबळांच्या घरासमोर भल्या पहाटे निषेधाची काळी रांगोळी, पोलीस बंदोबस्तात वाढ, प्रकरण काय?

Nashik Water | नाशिकमध्ये गुरुवारी निर्जळी; शुक्रवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा!

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटेला 40 वर्षे पूर्ण; आजवर 64 संमेलनांचे आयोजन, पर्यावरण चळवळीच्या अनोख्या कार्याला उजाळा…!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें