अल्पवयीन मुलीवर निफाडमध्ये गँगरेप; संशयित पोलिसांच्या ताब्यात, 22 मे पर्यंत पोलीस कोठडी

| Updated on: May 18, 2022 | 11:36 PM

पोलिसांनी निफाड न्यायालयासमोर उभा केले असता, दोघानाही 22 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

अल्पवयीन मुलीवर निफाडमध्ये गँगरेप; संशयित पोलिसांच्या ताब्यात, 22 मे पर्यंत पोलीस कोठडी
नाशिक जिल्ह्यातील खेरवाडीत सामुहिक बलात्कार, दोघाना अटक
Follow us on

नाशिकः नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील खेरवाडी (Kherwadi, Nashik) येथे अल्पवयीन मुलींवर (Minor girl) दोघांनी सामुहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी कोणाला काही सांगितलेस तर तुझ्या भावाला मारून टाकीन तसेच शाळेत तुझी बदनामी मी करू अशी धमकीही त्या अल्पवयीन मुलीला देण्यात आली होती. याप्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करत पोलिसांनी दोघांना अटक केलीकेल्याने एकच खळबळ उडाली

सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निफाड तालुक्यातील खेरवाडी येथे सामूहिक बलात्कार प्रकरणी अटकेत असलेले आरोपी समाधान बाजीराव संगमनेरे (रा. खेरवाडी, ता.निफाड) व संतोष उर्फ पिंटू केदु उर्फ केरु बेंडकुळे (रा. खेरवाडी) हल्ली मुक्काम निर्मला विहार निळवंडी रोड दिंडोरी या दोघांनी शेजारी राहत असलेल्या अल्पवयीन मुलीला घरात बोलवून तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. यापूर्वी त्यांनी पूर्वतयारी करून दरवाजाची आतून कडी लावून पीडित अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

मुलीला दोघांकडून धमकी

या घटनेनंतर त्त्या मुलील या दोघांनी धमकी देत याबाबत कोणालाही काही सांगितले तर तुझ्या भावाला मारून टाकीन आणि तुझ्या शाळेत बदनामी करण्याची धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या त्या मुलीने ही गोष्ट घरी सांगितल्यानंतर या प्रकरणी त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बालकांचे संरक्षणनुसार गुन्हा

याप्रकरणी पोलीस अधीक्षक सचिन पाटील, पोलीस उपाधिक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनानुसार सायखेडा पोलीस ठाण्यात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 व 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी तपास करत आहे. या प्रकरणी या दोघे आरोपींना निफाड न्यायालयात हजर केले असता 22 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.