नाशिककरांचा लसीकरणाला उदंड प्रतिसाद, 17 लाख नागरिकांनी घेतली लस

| Updated on: Jul 21, 2021 | 2:01 PM

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राज्यभरात वेगाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे.नाशिक जिल्ह्यात देखील या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतोय.

नाशिककरांचा लसीकरणाला उदंड प्रतिसाद, 17 लाख नागरिकांनी घेतली लस
सांकेतिक फोटो
Follow us on

नाशिक: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राज्यभरात वेगाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे.नाशिक जिल्ह्यात देखील या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल 17 लाखांहून अधिक नागरिकांच लसीकरण झालंय.

दुसऱ्या लाटेतील लसीकरणाचा फायदा लक्षात घेता,नागरिक लसीकरण करण्याकडे वळू लागलेत. 13 लाख 2 हजार 397 नागरिकांचा पहिला डोस झालाय तर 3 लाख 98 हजार 101 नागरिकांचा दुसरा डोस झालाय. यांमध्य कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा समावेश आहे.काही प्रमाणात लसीचा तुटवडा निर्माण होत आहे.मात्र ते ही लवकरच सुरळीत होईल., असं जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी दिली.

नाशिक कोरोना अपडेट 20 जुलै

पूर्ण बरे झालेले रुग्ण- 146
पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 80

नाशिक मनपा- 53
नाशिक ग्रामीण- 21
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 06

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8482

20 जुलै रोजी कळवलेले मृत्यू:- 04
नाशिक मनपा- 03
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 01
जिल्हा बाह्य- 00

कोरोनाच्या संकाटामुळं घरातचं ईद

कोरोनाचं संकट बघता नाशिकमध्ये मुस्लिम बांधवांनी घरातच ईद साजरी केली.दरवर्षी शहरातील इदगाह मैदानावर शेकडोच्या संख्यने मुस्लिम बांधव एकत्रित येत नमाज पठण करत ईद साजरी करत असतात.मात्र, यंदा कोरोनाच्या महासंकटामुळे ईद सामूहिकरित्या साजरी करण्यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली होती. प्रशासनाच्या आवाहनला प्रतिसाद देत घरातच मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलं.

गावात रुग्ण सापडला तर शाळा बंद होणार

जिल्ह्यातील 8 वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील एक महिन्यात ज्या गावात एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही, अशा गावात शाळा सुरु होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 1 हजार 24 शाळांपैकी कोरोनामुक्त 335 गावातील 296 शाळा सुरु झाल्या आहेत. एका बाकड्यावर एकच मुलगा बसेल. शाळांना नियम पाळावे लागतील. गावात रुग्ण सापडला तर शाळा बंद होणार, असंही भुजबळ यांनी सांगितलं.

सर्व कार्यक्रमांवर बंदी

जिल्ह्यातील राजकीय, सरकारी आणि सामाजिक कार्यक्रम उद्यापासून बंद करण्यात येत आहे. फक्त ऑनलाईन कार्यक्रमांना परवानगी दिली जाईल. दुकानं दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरु राहतील. त्यापेक्षा जास्त वेळ त्यांना देता येणार नाही. त्याचबरोबर विकेंडला जमावबंदीचे आदेश लागू असतील. सध्यस्थितीमुळे निर्बंध शिथिल होणार नाही. उलट अधिक कडक केले जातील, असे संकेतही भुजबळ यांनी यावेळी दिले आहेत.

इतर बातम्या:

Nashik Water Cut : नाशिककरांनो पाणी जपून वापरा, उद्यापासून पाणी कपातीच्या निर्णयाची अमंलबजावणी सुरु

नाशिकमध्ये पावसाचं कमबॅक, संततधार सुरु, नाशिककरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा, पाणी कपातीचं संकट कायम

Nashik Corona Vaccine near about seventeen lakh people take jab corona vaccine