Nashik Water Cut : नाशिककरांनो पाणी जपून वापरा, उद्यापासून पाणी कपातीच्या निर्णयाची अमंलबजावणी सुरु

जून महिन्यापासून नाशिक जिल्ह्याकडे पाठ फिरवलेला पाऊस अखेर सुरु झाला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. मात्र, जिल्ह्यात सरासरी 28 टक्केच पावसाची नोंद झाली आहे.

Nashik Water Cut : नाशिककरांनो पाणी जपून वापरा, उद्यापासून पाणी कपातीच्या निर्णयाची अमंलबजावणी सुरु
Nashik Municipal corporation

नाशिक: जून महिन्यापासून नाशिक जिल्ह्याकडे पाठ फिरवलेला पाऊस अखेर सुरु झाला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. मात्र, जिल्ह्यात सरासरी 28 टक्केच पावसाची नोंद झाली आहे. पाऊस कमी प्रमाणात झाल्यानं शेतीची कामं देखील खोळंबली आहेत. नाशिकच्या धरणांमध्ये कमी पाणी साठा असल्यानं पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक शहरात उद्यापासून पाणी कपात सुरु होत आहे, दर गुरुवारी पाणी कपात करण्यात येणार आहे. नाशिक प्रशासनाच्या या निर्णयामुळे शहरात उद्या दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही. पाणीकपातीचा उद्या पहिला दिवस आहे.

दर गुरुवारी पाणी कपात

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समुहात जोपर्यंत 50 टक्के इतका पाणी साठा होणार नाही तोपर्यंत पाणी कपात सुरु ठेवण्यात येणार आहे. आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी असणार पाणी कपात सुरु ठेवण्यात आली आहे. महापालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नाशिकमध्ये दोन दिवसांपासून संततधार

नाशिक शहर आणि परिसरात पावसाचा जोर वाढला. रविवारपासून नाशिक जिल्ह्यातील विविध भागात पावसानं दमदार हजेरील लावली असून सलग दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. पावसाच्या हजेरीने पेरणीच्या कामांना वेग आल्याचंही पाहायला मिळालं आहे. नाशिकच्या धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने धरण साठ्यात वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 48 टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे पेरण्यांच्या कामाला वेग येणार आहे. मराठवाड्याची भिस्त असलेल्या दारणा समूहात गतवर्षीपेक्षा 3 टक्के कमी साठा असल्याचंही समोर आलं आहे.

महापालिकेसमोर थकबाकी वसुलीचं आव्हान

नाशिक महापालिकेनं शहरातील तब्बल 7 हजार नळ कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे. कोरोना काळात घरपट्टी,पाणीपट्टी थकवल्याने मनपाच्या तिजोरीत मोठी घट आली आहे. आतापर्यंत महापालिकेची थकबाकी 400 कोटींपर्यंत गेली आहे. नाशिक महापालिकेचे पाणीपट्टीचे एकूण 20 हजार पेक्षा अधिक थकबाकीदार आहेत. त्यापैकी शहरात 7 हजार थकबाकीदार आहेत. थकबाकीदारांना 7 दिवसात थकीत पाणीपट्टी भरण्याचा दिला अल्टीमेटम,अन्यथा नळ कनेक्शन तोडण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेच्या वतीनं देण्यात आला होता.

इतर बातम्या:

Nashik School Reopen :नाशिकच्या 335 गावांमध्ये उद्यापासून शाळांची घंटा वाजणार, 296 शाळा सुरु

नाशिक जिल्ह्यात कलम 144 लागू, पर्यटन स्थळं आणि सर्व कार्यक्रमांवर कडक निर्बंध, जिल्ह्याधिकाऱ्यांचे आदेश

Nashik Municipal Corporation implemented water cut from tomorrow due to low water storage in dams and rain

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI