AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक जिल्ह्यात कलम 144 लागू, पर्यटन स्थळं आणि सर्व कार्यक्रमांवर कडक निर्बंध, जिल्ह्याधिकाऱ्यांचे आदेश

नाशिक जिल्ह्यात 18 जुलैपासून 31 जुलैपर्यंत कलम 144 अर्थात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. 18 जुलैच्या सकाळी 7 वाजेपासून ते 31 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.

नाशिक जिल्ह्यात कलम 144 लागू, पर्यटन स्थळं आणि सर्व कार्यक्रमांवर कडक निर्बंध, जिल्ह्याधिकाऱ्यांचे आदेश
नाशिक महापालिका.
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 11:01 PM
Share

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसून येत नाही. कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलाय. त्यानुसार आता नाशिक जिल्ह्यात 18 जुलैपासून 31 जुलैपर्यंत कलम 144 अर्थात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. 18 जुलैच्या सकाळी 7 वाजेपासून ते 31 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. (Section 144 enforced in Nashik district, strict restrictions on tourist places and all programs)

जिल्ह्यात कलम 144 लागू असण्याच्या काळात सर्व पर्यटन स्थळं, सर्व राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि शासकीय कार्यक्रमांवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात अशा कुठल्याही कार्यक्रमात 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित येणार प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंतच दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी आहे. दुकानांसाठी वेळेची मर्यादा वाढवून देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, ती मान्य करण्यात आलेली नाही.

गावात रुग्ण सापडला तर शाळा बंद होणार

जिल्ह्यातील 8 वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील एक महिन्यात ज्या गावात एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही, अशा गावात शाळा सुरु होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 1 हजार 24 शाळांपैकी कोरोनामुक्त 335 गावातील 296 शाळा सुरु होत आहे. एका बाकड्यावर एकच मुलगा बसेल. शाळांना नियम पाळावे लागतील. गावात रुग्ण सापडला तर शाळा बंद होणार, असंही भुजबळ यांनी सांगितलं.

सर्व कार्यक्रमांवर उद्यापासून बंदी

जिल्ह्यातील राजकीय, सरकारी आणि सामाजिक कार्यक्रम उद्यापासून बंद करण्यात येत आहे. फक्त ऑनलाईन कार्यक्रमांना परवानगी दिली जाईल. दुकानं दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरु राहतील. त्यापेक्षा जास्त वेळ त्यांना देता येणार नाही. त्याचबरोबर विकेंडला जमावबंदीचे आदेश लागू असतील. सध्यस्थितीमुळे निर्बंध शिथिल होणार नाही. उलट अधिक कडक केले जातील, असे संकेतही भुजबळ यांनी यावेळी दिले आहेत.

नाशिकमध्ये पाणी कपातीचा निर्णय

अद्याप पाऊस समाधानकारक झालेला नाही. त्यामुळे शेतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. अशावेळी प्रत्येक भागातील प्रशासकीय अधिकारी योग्य तो निर्णय घेतील अशा सूचना दिल्या आहेत. नाशिकमध्ये पाऊस नसल्यामुळे त्याचा परिणाम मुंबईच्या पाणीसाठ्यावर होणार असल्याचंही भुजबळ म्हणाले. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक आठवड्याला गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहील. धरणात 50 टक्के पाणीसाठी होण्यापर्यंत हा निर्णय लागू असेल, अशी माहिती भुजबळ यांनी दिलीय.

इतर बातम्या :

मनसेचे नाशिकमध्ये ‘मिशन कमबॅक’; राज ठाकरेंच्या दौऱ्यात पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले

30 वर्षांपासून रस्त्यावर एकही खड्डा नाही, तरीही रस्ता खोदण्याचं काम, नाशिक स्मार्ट सिटी प्रशासनाचं चाललंय काय?

Section 144 enforced in Nashik district, strict restrictions on tourist places and all programs

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.